गुरुवार, २२ ऑक्टोबर, २००९

मुलांसाठी सुटीतील ‘अॉनलाईन’ टाईमपास

funology_ad_300x250

सुट्यामधे आपल्या आवडी-निवडीनुसार गाण्याचे, वाद्यांचे, खेळांचे क्लास लावण्यापासून ते पूर्णवेळ शिबिरांपर्यंत आणि मामाच्या गावापासून ते सिंगापूर, मलेशियापर्यंत विविध पर्याय मुलांसमोर उपलब्ध असतात. मुलांचा उत्साह भलता दांडगा असतो. सकाळी दोन-दोन क्लास करूनही ही मुलं थकत नाहीत. दुपारी रणरणत्या उन्हातदेखील बाहेर पडायची त्यांची तयारी असते. हे टाळण्यासाठी त्यांना घरातच कोणत्यातरी अॅक्टिव्हिटीमध्ये गुंतवून ठेवता येईल का, याचा विचार सतत आई-वडिलांच्या डोक्यात सुरू असतो.

टीव्ही पाहू द्यावा? नको…
कॉम्प्युटर गेम खेळू द्यावा? नको…
बैठे खेळ? आवडत नाहीत…

अशा वेळी तुम्ही त्यांना काही उत्तम वेबसाईट्सवर गुंतवून ठेवू शकता. खास मुलांसाठी तयार केलेल्या या साईट्समुळे ती गुंतूनही राहतील आणि त्यांच्या ज्ञानात भरदेखील पडेल.

१. फनॉलॉजीः

आई, मला बोअर होतंय…काय करू सांग ना, या प्रश्नावरचं उत्तर म्हणजे फनॉलॉजी डॉट कॉम! उन्हाळ्याच्या सुटीसाठी एक आदर्श साईट म्हणून या साईटचा उल्लेख करता येईल. जादुचे प्रयोग, विज्ञानातील खेळ, मेंदूला चालना देणारे छोटे गेम्स, मुलांना करता येतील अशा रेसिपीज आणि आणखीही बरंच काही या साईटवर पाहायला मिळेल. मुलांच्या ज्ञानात भर घालेल अशी माहिती ‘व्हॅकी फॅक्ट्स’ या सेक्शनमध्ये मिळेल.

Link: http://www.funology.com/

२. बॉब द बिल्डर

बॉब द बिल्डर या सुप्रसिद्ध कार्टून कॅरेक्टरची ही वेबसाईट. बॉब मुलांना नवनवीन गोष्टी बांधायला शिकवेल. उदा. मैदान बांधण्यासाठी कोणकोणते साहित्या लागते, कोणकोणत्या स्टेप्स असतात हे सांगितल्यानंतर मुलांनी योग्य साहित्य निवडून ठरवून दिलेली स्टेप पूर्ण करायची. असे विविध प्रोजेक्ट्स यात आहेत. शिवाय रंग भरण्यासाठी विविध पोस्टर्सदेखील उपलब्ध आहेत.

Link: http://www.bobthebuilder.com/uk/

३. नासा किड्स क्लबः

मुलांना काही वेळा अगदी टाईमपास गेम्स खेळायला आवडतं. अशा टाईमपास गेम्समधून अंतराळाची रहस्यमय सफर घडवायची असेल तर त्यांना नासा किड्स क्लब या साईटची ओळख करून द्या. स्मरणशक्ती वाढवणारे छोटे-छोटे गेम्स खेळण्यात मुलं कशी दंग होऊन जातील, हे कळणार देखील नाही.

Link: http://www.nasa.gov/audience/forkids/kidsclub/flash/index.html

४. सीझम स्ट्रीटः

विविध कार्टून कॅरेक्टर्ससोबत धमाल गेम्स खेळण्यासाठी सीझम स्ट्रीट ही एक उत्तम साईट आहे. गेम्ससोबतच सीझम प्लेलिस्ट्स या विशेष सेक्शनमधून मुलांना पर्यावरणाचे महत्त्व, एकमेकांची काळजी घेणे असे विषयही समजावून सांगता येतात.

Link: http://www.sesamestreet.org/home

५. पझल चॉईसः

मुलांना गेम्स किंवा अॅक्टिव्हिटीज आवडत नसतील तर त्यांच्यासाठी विविध पझल्स देणारी ही एक उत्तम साईट. यातील विशेष सेक्शनमध्ये खास मुलांसाठी तयार केलेली शब्दकोडी, सुडोकू, संख्याकोडी तुम्हाला पाहायला मिळतील. या कोड्यांचे प्रिंट आऊट काढून तुम्ही मुलांना सोडवायला देऊ शकता.

Link: http://www.puzzlechoice.com/pc/Kids_Choicex.html

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा