सोमवार, ९ नोव्हेंबर, २००९

पक्ष्यांचे आवाज - श्री. शरद आपटे.

महाराष्ट्रातील पक्ष्यांचे श्री। शरद आपटे यांनी प्रत्यक्ष निसर्गात जाऊन आधुनिक यंत्रणेच्या साहायाने टिपलेले अस्सल आवाज ... रंगीबेरंगी पक्षी आणि त्यांचे चित्रविचित्र आवाज आपलं चटकन्‌ लक्ष वेधून घेतात. आपण आपल्या परीनं पक्षांचे आवाज शब्दात पकडण्याचा प्रयत्न करतो. कोकीळ पक्षाचा कुहू कुहू, पावश्याचा पेर्ते व्हा, शिंच्याचा च्युव्हिट्‌ च्युव्हिट्‌ किंवा तांबट्याचा पुक्‌ पुक्‌ ! पक्षांचे आवाज ओळखता आले, तर पक्ष्यांची ओळख तर पटेलच शिवाय त्यांच्या वागणुकीचे असंख्य कंगोरे दिसायला लागतात. पक्षी आणि प्राणी यांच्यातलं नातं उलगडतं. या ध्वनीफितीमध्ये महाराष्ट्रात दिसणार्‍या अनेक पक्ष्यांचे आवाज ध्वनीमुद्रित केले आहेत. हे आवाज श्री शरद आपटे यांनी आधुनिक उपकरणांच्या साहाय्याने टिपले आहेत. त्यास अवश्य भेट द्या।

http://www.birdcalls.info/BetaApp/BetaApp.php

शुक्रवार, ६ नोव्हेंबर, २००९

एक अशी ही स्पर्धा ...

काही वर्षांपूर्वीची. सिएटलच्या ऑलिम्पिकमध्ये शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेत सहभागी झालेले नऊ स्पर्धक स्पर्धा सुरू होण्याच्या संकेताची वाट पाहात जय्यत तयार उभे होते. ही सारी मुलं शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या अपंग होती. पिस्तुलाचा आवाज झाला आणि शर्यत सुरू झाली. साऱ्यांनाच पळता येत होतं असं नाही. पण, प्रत्येकाला स्पर्धेत भाग घ्यायचा होता आणि महत्त्वाचं म्हणजे जिंकायचं होतं. धावता धावता एकाचा तोल गेला.. काही गोलांट्याखाऊन तो पडला आणि रडू लागला. त्याच्या रडण्याचा आवाज ऐकून अन्य आठही जण पळायचे थांबले. सारे मागे फिरले... सारे जण... " डाउन्स सिन्ड्रोम 'ची व्याधी असलेली एक मुलगी त्याच्या जवळ बसली. तिने त्याला मिठी मारली आणि मग विचारलं, ""आता बरं वाटतंय? ' ' मग साऱ्यांनी त्याला उभं केलं आणि अंतिम रेषेपर्यंत सारे खांद्याला खांदा लावून चालत गेले. ते दृष्य पाहून मैदानावर उपस्थित असलेले सारेजण हेलावून गेले. उभे राहून मानवंदना देत साऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. बराच काळ त्या टाळ्यांचा आवाज आसमंतात गुंजत होता... त्यावेळी तिथे उपस्थित असलेली मंडळी अजूनही त्या घटनेची आठवण काढतात. का ? कुठेतरी आत खोलवर आपल्याला प्रत्येकाला ठाऊक असतं की आयुष्यातली सर्वांत महत्त्वाची गोष्ट असते ती स्वतःसाठी जिंकण्यापेक्षा इतरांना जिंकायला मदत करणं. त्यासाठी वेळप्रसंगी आपला वेग कमी करावा लागतो किंवा अगदी शर्यतच बदलावी लागते..

गुरुवार, २२ ऑक्टोबर, २००९

उपयुक्त वेबसाइट्स ...

मला आवडलेल्या विविध वेबसाइट्स ....
अध्यात्म विषयक
http://www.vishwachaitanyamission.com/mr/node/121
http://www.pujaarcha.com/aarti

वास्तुशास्र
http://www.sanatan.org/marathi/dainik/visheshank/vaastushastra/index.htm#2

श्राधविधि
http://sanatan.org/marathi/dainik/visheshank/pitrupaksha/pitru1.htm#1


शिक्षण
http://sites.google.com/site/pearlsproject/

http://marathishabda.com/?q=node/126

http://marathishabda.com/?q=node/122

http://www.baljagat.com

http://www.avakashvedh.com/

http://www.school4all.org


शैक्षणिक पाठ्यपुस्तके

http://www.indg.in/primary-education/childrenscorner/viit_indg


ई - पुस्तके

http://sites.google.com/site/marathinet/Home/vacaka-1

http://www.khapre.org
http://www.scribd.com/people/documents/635222/folder/24459

मृत्यूची तारीख सांगनारी वेबसाइट

http://www.deathclock.com/


संगणक शिक्षण

http://aapalasanganak.blogspot.com/

मुलांसाठी सुटीतील ‘अॉनलाईन’ टाईमपास

funology_ad_300x250

सुट्यामधे आपल्या आवडी-निवडीनुसार गाण्याचे, वाद्यांचे, खेळांचे क्लास लावण्यापासून ते पूर्णवेळ शिबिरांपर्यंत आणि मामाच्या गावापासून ते सिंगापूर, मलेशियापर्यंत विविध पर्याय मुलांसमोर उपलब्ध असतात. मुलांचा उत्साह भलता दांडगा असतो. सकाळी दोन-दोन क्लास करूनही ही मुलं थकत नाहीत. दुपारी रणरणत्या उन्हातदेखील बाहेर पडायची त्यांची तयारी असते. हे टाळण्यासाठी त्यांना घरातच कोणत्यातरी अॅक्टिव्हिटीमध्ये गुंतवून ठेवता येईल का, याचा विचार सतत आई-वडिलांच्या डोक्यात सुरू असतो.

टीव्ही पाहू द्यावा? नको…
कॉम्प्युटर गेम खेळू द्यावा? नको…
बैठे खेळ? आवडत नाहीत…

अशा वेळी तुम्ही त्यांना काही उत्तम वेबसाईट्सवर गुंतवून ठेवू शकता. खास मुलांसाठी तयार केलेल्या या साईट्समुळे ती गुंतूनही राहतील आणि त्यांच्या ज्ञानात भरदेखील पडेल.

१. फनॉलॉजीः

आई, मला बोअर होतंय…काय करू सांग ना, या प्रश्नावरचं उत्तर म्हणजे फनॉलॉजी डॉट कॉम! उन्हाळ्याच्या सुटीसाठी एक आदर्श साईट म्हणून या साईटचा उल्लेख करता येईल. जादुचे प्रयोग, विज्ञानातील खेळ, मेंदूला चालना देणारे छोटे गेम्स, मुलांना करता येतील अशा रेसिपीज आणि आणखीही बरंच काही या साईटवर पाहायला मिळेल. मुलांच्या ज्ञानात भर घालेल अशी माहिती ‘व्हॅकी फॅक्ट्स’ या सेक्शनमध्ये मिळेल.

Link: http://www.funology.com/

२. बॉब द बिल्डर

बॉब द बिल्डर या सुप्रसिद्ध कार्टून कॅरेक्टरची ही वेबसाईट. बॉब मुलांना नवनवीन गोष्टी बांधायला शिकवेल. उदा. मैदान बांधण्यासाठी कोणकोणते साहित्या लागते, कोणकोणत्या स्टेप्स असतात हे सांगितल्यानंतर मुलांनी योग्य साहित्य निवडून ठरवून दिलेली स्टेप पूर्ण करायची. असे विविध प्रोजेक्ट्स यात आहेत. शिवाय रंग भरण्यासाठी विविध पोस्टर्सदेखील उपलब्ध आहेत.

Link: http://www.bobthebuilder.com/uk/

३. नासा किड्स क्लबः

मुलांना काही वेळा अगदी टाईमपास गेम्स खेळायला आवडतं. अशा टाईमपास गेम्समधून अंतराळाची रहस्यमय सफर घडवायची असेल तर त्यांना नासा किड्स क्लब या साईटची ओळख करून द्या. स्मरणशक्ती वाढवणारे छोटे-छोटे गेम्स खेळण्यात मुलं कशी दंग होऊन जातील, हे कळणार देखील नाही.

Link: http://www.nasa.gov/audience/forkids/kidsclub/flash/index.html

४. सीझम स्ट्रीटः

विविध कार्टून कॅरेक्टर्ससोबत धमाल गेम्स खेळण्यासाठी सीझम स्ट्रीट ही एक उत्तम साईट आहे. गेम्ससोबतच सीझम प्लेलिस्ट्स या विशेष सेक्शनमधून मुलांना पर्यावरणाचे महत्त्व, एकमेकांची काळजी घेणे असे विषयही समजावून सांगता येतात.

Link: http://www.sesamestreet.org/home

५. पझल चॉईसः

मुलांना गेम्स किंवा अॅक्टिव्हिटीज आवडत नसतील तर त्यांच्यासाठी विविध पझल्स देणारी ही एक उत्तम साईट. यातील विशेष सेक्शनमध्ये खास मुलांसाठी तयार केलेली शब्दकोडी, सुडोकू, संख्याकोडी तुम्हाला पाहायला मिळतील. या कोड्यांचे प्रिंट आऊट काढून तुम्ही मुलांना सोडवायला देऊ शकता.

Link: http://www.puzzlechoice.com/pc/Kids_Choicex.html

ई-प्रशासनाच्या भारतात उपलब्ध असणार्‍या ऑनलाइन सेवा

तुमची रेल्वेची तिकिटे ऑनलाईन आरक्षित करा

www.irctc.co.in
www.erail.in

bix
धावणार्या रेल्वेगाड्यांची स्थिती ऑनलाईन पहाणे
http://www.trainenquiry.com/indexNS.aspx

एअर इंडियाची तिकिटे आरक्षित करणे
http://indian-airlines.nic.in/scripts/flightstatus.aspx

पासपोर्टसाठी ऑनलाईन अर्ज करा
http://passport।nic.in/

पॅनकार्डसाठी ऑनलाईन अर्ज करा
https://tin.tin.nsdl.com/pan/

bix
ऑनलाइन आयकर परतावा (इन्कम टॅक्स रिटर्न्स) भरणे
http://incometaxindia.gov.in/

लोकोपयोगी अर्ज
तुमच्या तक्रारी माहितीच्या अधिकाराखाली नोंदवा
http://rti.india.gov.in/rti_direct_complaint_lodging.php

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती - वॉरन बफे

१.त्यांनी वयाच्या अवघ्या अकराव्या (११) वर्षी शेअर बाजारात गुंतवणुक करण्यास सुरुवात केली. आणि तरी देखिल आपण खुप उशीरा सुरुवात केली याची त्यांना खंत आहे.

२. वृत्तपत्रे विकुन मिळवलेल्या कमाईतून त्यांनी एक छोटीशी शेत जमीन विकत घेतली. वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी.

३. ते आजही मिड टाउन येथील त्यांच्या जुन्या ३ बेडरूमच्या घरात राहतात, जे त्यांनी ५० वर्षांपुर्वी त्यांच्या लग्नाच्या आधी घेतले होते. वॉरन बफे यांच्या मते त्यांना मोठ्या घराची गरज नाही. आजही त्यांच्या घराला कुंपणाची भिंत नाही.

४. वॉरन बफे त्यांची कार स्वतःच चालवतात. त्यांना ड्रायव्हर अथवा सुरक्षा रक्षकांची गरज नाही.

५. वॉरन बफे जगातील सर्वात मोठ्या विमान कंपनीचे मालक आहेत. पण ते कधीही स्वतंत्र विमानाने प्रवास करत नाहीत.

६. त्यांची कंपनी बर्कशायर हाथवेच्या (Berkshire Hathaway) मालकीच्या ६३ कंपन्या आहेत. या सर्व कंपन्यांच्या CEO's (कार्यकारी अधिकारी) ना ते फक्त वर्षाला एक पत्र लिहितात. सर्व CEO's ना त्यांनी दोन नियम सांगीतले आहेत. पहिला नियम, कधीही आपल्या गुंतवणुकदारांचे पैसे बुडणार नाहीत याची काळजी घ्या. दुसरा नियम, कधीही पहिला नियम विसरु नका.

७. त्यांना इतर उच्च वर्गीयांबरोबर वेळ व्यतीत करणे आवडत नाही. घरी आल्यावर स्वतःसाठी काही पॉपकॉर्न बनवुन चित्रपट बघणे हा त्यांचा आवडता छंद आहे.

८. बिल गेट्स या जगातील दुसर्‍या श्रीमंत माणसाची त्यांच्याशी पाच वर्षांपुर्वी भेट झाली. बिल गेट्सला तेव्हा वाटले की वॉरन बफेंबरोबर बोलण्या सारखे काहीच नाही त्यामुळे त्यांनी मीटींग साठी केवळ अर्ध्या तासाचा वेळ दिला. मात्र प्रत्यक्षात ही भेट दहा तास चालली. आणि त्या भेटी नंतर बिल गेटस हे वॉरन बफे यांचे भक्तच झाले.

९. वॉरन बफे आजही मोबाइल फोन वापरत नाहीत.तरुणांसाठी वॉरन यांचा सल्ला - "क्रेडीट कार्ड पासुन दुर रहा. खरी गुंतवणुक स्वतःमध्ये करा."

-- पैशाने माणसाला घडवले नसुन माणसाने पैसा बनवला आहे.
-- जितकी साधे जीवनमान राखता येइल तितके साधे रहा.
-- ऐकावे जनाचे करावे मनाचे.
-- ब्रॅंड पाहुन खरेदी करु नका. आपल्याला जे आवडते तेच खरेदी करा.
-- अनावश्यक गोष्टींवर पैसे खर्च करु नका. तेवढेच विकत घ्या ज्याची गरज आहे.
दरवर्षी मी काही धोरणे अवलंबतो, जी पुढे वर्षभर सर्व उलाढालीत माझ्यासाठी दिप स्तंभाचे काम करतात.आणि स्वतहच शिकून घेतलेल्या या धड्यांमुळे दरवर्षी माझे फ़क्त वयच वाढत नाही तर शहाणपणाही तेवढाच वाढतो।

या वर्षी मी तुम्हा सर्वांना पुराणकाळापासून चालत आलेल्या (पण विस्म्रुतीत गेलेल्या)अशाच काही शहाण पणाच्या गोष्टी सांगणार आहे -


* अपार कष्ट करा : मेहनत कधिच वाया जात नाही, पण काम न करता केलेली बाप्ष्फळ बडबड माण्साला लयास नेल्या खेरिज राहत नाही.

* आळस झटकुन टाका : वाळुवर झोपुन राहणारा खेकडा कोणत्याही लाटेबरोबर समुद्रात वाहुन जातो.

* ऊत्पन्न(मिळकत) : कधिही केवळ एका उत्पन्नाच्या साधनावर अवलंबून राहु नका. एका मर्गाने येणाऱ्या १०० रुपयांपेक्षा १०० मर्गांनी येणारा १-१ रुपया नेहमीच चांगला.

* खर्च - आवश्यकते पेक्षा जास्त खरेदी केली तर लवकरच आवश्यक असणारया गोष्टी विकाव्याची वेळ येईल.

* बचत - खर्च करुन उरलेले उत्पन्नाची बचत करण्यापेक्षा, आधी बचत करुन नंतर उरलेले पैसे खर्च करा.

* कर्ज - कर्ज घेणारा हा कर्ज देणरयाचा गुलाम हॊउन जातो.



* जमाखर्च - जमाखर्च मांडणे आणि त्याचा अभ्यास करणे अतिशय मह्त्वाचे आहे. जर बूटच फ़ाटला असेल तर पावसाळ्यात छ्त्रीचा काय उपयोग ?

* हिशोब तपासणे - लहान लहान खर्चांचा ताळेबंद ठेवा, एक छोट्याशा भोकामुळे पुर्ण जहाज बुडू शकते.

* आर्थिक धोका - बरयाच इन्वेस्ट्मेन्ट्स भरपुर फ़ायदा देणरया आणी आकर्षक असतात मात्र त्यात तेवढाच धोका लपलेला असतो. त्यामुळे अशा इन्वेस्ट्मेन्ट्सचा जरा काळजीपुर्वक विचार करुन करा. जर नदीची खोली पहायची असेल तर दोन्ही पाय पाण्यात टाकुन कसे चालेल?
* गुंतवणुक - सर्व अंडी एकाच पारड्यात टाकुन कसे चालेल बरे?

मला खात्री आहे की जे या सर्व सुचनांचे आधीपासून पालन करत आहेत, त्य सर्वांची आर्थिक परिस्थिती उत्तम असेल. आणी मी हे देखिल खात्रीपुर्वक सांगु शकतो, कि जे या सर्व सुचनांचे पालन करायचे ठरवतिल तेही लवकरच आर्थिक सुखाचा आनंद घेतिल. चला आपण सर्वजण हुशार हॊउया आणि एक सुखी, समाधनी आणी शांत जीवन जगुया।

प्लीज - मला माफ करशील?


त्याला ती एका पार्टीत भेटली. खुप सुंदर होती ती. साहजिकच तिच्या मागे खुपजण होते. ती सुंदर होती, बुध्दिमानही होती. सर्वांनाच हवीहवीशी वाटणारी. पण ती कोणालाच जवळीक साधु देत नव्हती.
तो फार साधा. आर. के. लक्ष्मणच्या 'कॉमनमॅन' सारखा. त्याला तर त्याचे मित्रही भाव देत नव्हते. मग तिच्यासारख्या मुली तर चंद्राइतक्या अप्राप्यच! तिचं त्याच्याकडं लक्षही नव्हतं त्या पार्टीत. आपल्याच विश्वात मश्गुल होती ती!
पण आपण धाडस करायचच, असं ठरवून, सारं बळ एकवटुन त्यानं तिला विचारलं, 'तु पार्टी संपल्यावर माझ्याबरोबर कॉफी प्यायला येशील?' तिला 'नाही' म्हणणं फार सोप्पं होतं. पण त्याच्या डोळ्यांतले नितळ, पारदर्शी भाव आणि आवाजातलं आर्जव जाणुन तिला का कोण जाणे, 'हो' म्हणावसं वाटलं. ती 'हो' म्हणाली आणि त्याचं टेन्शन शतपटीनं वाढलं. या शक्यतेचा त्यानं विचारच केला नव्हता!
जवळच्याच कॉफी पार्लरमध्ये दोघं कोप-यातल्या टेबलावर बसली. कॉफीची ऑर्डर दिली. पण काय बोलायचं, हे त्याला सुचेचना! तो खुपच नर्व्हस झाला होता. आणि या गप्प गप्प अशा विचित्र डेटनं तीसुध्दा अवघडली. झक मारली आणि याला हो म्हटलं, असंही मनात आलं तिच्या!
कॉफीचा एक घोट पोटात गेल्यावर अचानक त्याला कंठ फुटला. त्यानं वेटरला हाक मारली. वेटर प्रश्नार्थक चेह-यानं टेबलाजवळ येऊन उभा राहीला. तो म्हणाला, 'थोडं मीठ देता? मला कॉफीत टाकायचंय!' सारं कॉफी शॉप या अनपेक्षित मागणीनं गोंधळात पडलं. विचित्र नजरेनं सारे त्याच्याकडे पाहु लागले. तीसुध्दा!
वेटरनं मुकाट्याने मीठ आणुन दिलं आणि देताना - "कैसे कैसे लोग आते है!" अशा अर्थाचा चेहराही केला. त्यानं मीठ कॉफीत टाकलं आणि तो कॉफी पिऊ लागला! ती खरंच गोंधळली होती. अशी विचित्र डेट आणि आता कॉफीमध्ये चक्क मीठ! अखेरीस तिनं विचारलंच "पण तुला ही अशी जगावेगळी सवय कशी काय लागली?"
"माझं लहानपण समुद्रकाठी गेलं..." शब्दांची जुळवाजुळव करत तो म्हणाला... "सारखा मी समुद्राच्या पाण्यात खेळत असे. आई कॉफी प्यायला हाक मारायची, तसा मी धावत धावत व्हरांड्यात येई आणि खारटलेल्या पाण्यानं खारटलेली बोटं बशीतल्या कॉफीत बुडवून पीत असे. आता आई राहिली नाही. आणि ते समुद्रकाठचं घरही. पण खारट कॉफीची चव जिभेवर आहे. खारटलेल्या कॉफीनं मला लहानपणच्या आठवणी पुन्हा भेटतात. ती चव बरोबर सगळं बालपण घेऊन येते..." भरलेल्या डोळ्यांनी तो म्हणाला.
तिचं ह्र्दय भरून आलं - त्याच्या निरागसतेनं. किती हळुवार होतं त्याचं मन. मग तीही बोलली... आपल्या दुरवरच्या घराबद्दल, बाबांबद्दल... तिच्या स्वप्नांबद्दल... खरचं खुप छान डेट झाली ती!
मग ते पुन्हा पुन्हा भेटत राहीले.
अखेर तिला पटलं, हाच आपला जीवनसाथी. तो शांत होता. संयमी होता. हळुवार होता. तिची काळजी घेणारा होता. मग एके दिवशी दोघांनी ठरवलं आणि लग्न केलं! चार-चौघांसारखं आयुष्य सुरु झालं आणि दिवस खुप मजेत जाऊ लागले. एखाद्या परीकथेसारखे. खरंच त्यांचं आयुष्य खुप सुखी होतं. ती त्याच्यासाठी सर्वकाही करायची. कॉफीसुध्दा! आणि हो, त्याच्या बालपणाशी त्याची नाळ जोडलेली राहण्यासाठी चिमुटभर मीठही टाकायची त्या कॉफीत!
अशीच भर्रकन ४० वर्षं कधी उडुन गेली, ते कळंलच नाही. एके रात्री तो झोपला, तो पुन्हा कधीच न उठण्यासाठी...!
काही दिवसांनी ती सावरली. रोजचे व्यवहार नेहमीप्रमाणे करू लागली. एकदा सहज म्हणुन त्याचं पुस्तकांच कपाट आवरायला घेतलं असताना तिला त्यात एक चिठ्ठी सापडली. त्याच्या अखेरच्या दिवसात त्यानं ती कधीतरी लिहीली होती.
"माझ्या प्राणप्रिये, मला माफ कर! आयुष्यभर मी तुझ्याशी एका बाबतीत खोटं वागलो, त्याबद्द्ल मला क्षमा कर! हे एकच असत्य मी तुझ्याशी बोललो... पहिल्यांदा आणि शेवटचं! आयुष्यभर ही खंत मला जाचत राहिली. पण मी कधी तुला खरं सांगण्याची हिंमत करू शकलो नाही... केवळ तु मला खोटारडा म्हणशील आणि मी तुला गमावून बसेन या भीतीने!
प्रिये, आपण सर्वप्रथम जेव्हा कॉफी पार्लरमध्ये भेटलो, तेव्हा मला कॉफीमध्ये घालण्यासाठी खरं तर साखर हवी होती! त्या क्षणाला मी इतका नर्व्हस झालो होतो, की मी साखरेऐवजी चुकून मीठ मागितलं वेटरकडे. आणि मग त्या विषयावरून आपलं संभाषण सुरू झालं म्हणुन मी ते तसंच पुढे चालवून घेतलं...
खारट कॉफी मला आवडत नाही. किती विचित्र चव ती! पण मला तु खुप आवडतेस... आणि तुला गमावू नये म्हणुन आयुष्यभर मी खारट कॉफी मी पीत राहिलो.
...आता मरण्याआधी मी तुझ्यापाशी सत्य उघड केलंच पाहीजे. नाही तर हे खोटेपणाचं ओझं मी पेलू शकणार नाही! प्लीज - मला माफ करशील?"

कुठतरी थांबावं लागतच.~~


असाच मी एकदा सूट्टी घेऊन गोव्याला गेलो होतो.गोव्याच्या समुद्राच्या किनारपट्टीवर अनेक छोटी छोटी घरं आहेत.एक घर भाड्याने घेऊन मी थोडे दिवस राहत होतो.आमच्या बाजूच्या घरात एक जोडपं असंच काही दिवस मजेत घालवण्यासाठी येऊन राहिलं होतं.सुरवातीला आम्ही सकाळीच ऊठून समुद्र किना‌र्‍यावर फिरायला म्हणून जात होतो.सकाळीच कोळ्यांच्या मासे जाळ्यात पकडून टोपल्या भरभरून आणणार्‍या मोठ्या होड्या किनार्‍यावर आल्यावर कुतुहल म्हणून निरनीराळ्या प्रकारचे मासे निवडून आणलेल्या टोपल्यामधून आम्हाला हवे ते मासे त्यांच्याकडून विकत घेऊन दुपारच्या जेवणाला त्याचा उपयोग करायचो.ताज्या मास्यांची चव निराळीच असते.त्यामुळे रोज मासे खायची चटकच लागली होती.

आमचे शेजारी सुद्धा हळू हळू आमच्याच बरोबर सकाळीच ऊठून आम्हाला त्यांची कंपनी द्दायला लागले.त्यानाही मासे खाण्यात दिलचस्पी होती. त्यामुळे त्यांची आमची चांगलीच गट्टी जमली होती.हे आमचं शेजारचं जोडपं आमच्या नंतर आणखी काही दिवस गोव्याला राहाणार होतं.
अधिक चौकशी केल्यावर कळलं की त्यांच्या पत्नीला गोवं खूपच आवडायला लागल्याने त्यानी त्यांचा मुक्काम आणखी वाढवला होता. ते जवळपास आमच्या बरोबरच जायला निघणार होते.पण आता त्यानी विचार बदलला होता.बोलता बोलता कळलं की त्यांच्या बायकोला सर्विकल कॅनसरचा आजार झाला असून तिचा तो टर्मिनल आजार होता.हे ऐकून मला खूपच वाईट वाटलं.

गोवा सोडून परत निघण्यापूर्वी एकदा असेच आम्ही संध्याकाळी किनार्‍यावर त्यांच्या बरोबर फिरायला गेलो होतो.पौर्णिमेचा तो दिवस होता.समुद्राच्या फेसाळ लाटावर चंद्राचा प्रकाश पडून त्या जास्तच फेसाळलेल्या दिसत होत्या.थंड वारा पण आल्हादायक वातावरणात भर घालत होता.चालून चालून थोडे पाय दमले म्हणून जवळच वाळूत बसून गप्पा मारत होतो.
बोलता बोलता त्यांची पत्नी म्हणाली,
“माझ्या लहानपणी मला आठवतं माझी आई बरेच वेळा म्हणायची,
“जीवन असं जगावं की शेवटी पश्चाताप होऊ नये.
सदा सर्वदा प्रत्येकजण मरत असतो आणि जगत असतो.तुमचा काय अनुभव आहे ह्याचं यतार्थ चित्र तुम्ही तुमच्या मनात तयार केलं पाहिजे.तुमच्या बुद्धिमतेपूर्वक तुम्ही निवड केली पाहिजे.”
ती तशीच जगली.ती एका प्रसिद्ध मुलींच्या शाळेची प्रिन्सीपॉल होती.खेळाच्या दुनियेत तिनं नांव कमावलेलं होतं.आणि तिन सुदृढ मुलीना जन्म देऊन माझ्या वडीलाना संसारात मदत करून एका खेड्यात निवृतीच्या दिवसात लागणारं छोटसं घर बांधण्यात मदत करूं शकली.तिला हवं ते ती निमूटपणे करून आणि वयाच्या पंचायशी वर्षावर शांतिने निर्वतली.

पश्चाताप न होता आयुष्य़ जगणं हा मला तिच्याकडून मिळालेला धडा होता.मी माझ्या शिक्षणासाठी पैनपै जमवून शिकले आणि देशात जमेल तिथे प्रवास केला.चांगलं कार्य समजून समाजात जमेल तेव्हडी सेवा केली.पंचवीस वर्षाच्या माझ्या करियर मधे मी बर्‍याच मुलीना शिकवलं.
मी आणि माझ्या पतिने तिन मुलांच व्यवस्थित संगोपन केलं.आणि पाच नातवंडाच्या सहवासात आनंदाने जीवन कंठित आहो.
मी मला नशिबवान समजते की माझ्या पतिने मला माझ्या मर्जीचं जीवन जगायला संपूर्ण मूभा दिली.
मला आणखी शिक्षण मिळावं म्हणून त्याने घर संभाळून मदतीसाठी खूप धडपड केली.

अलीकडे एकाएकी माझ्या पोटात वेदाना येऊन खूप दूखू लागलं.आणि त्याचं निदान काढलं गेलं की मला सर्विकल कॅन्सर झाला आहे.त्याच्यावर उपाय म्हणून औषध उपचार केले गेले. मला डॉक्टर म्हणाले की मी जेमतेम एक वर्ष काढीन.पण मी माझं तत्वज्ञान सोडायला तयार नव्हते. मला जरा बरं वाटलं की मी माझ्या अनुभवाचं गाठोडं माझ्या पाठीवर मारते.मी मीत्रमैत्रिणीना भेटते,प्रवास करते,हंसत असते,चांगली पुस्तकं वाचते,नातवंडाबरोबर खेळते आणि जे माझ्यावर प्रेम करतात त्यांचा हृदयापासून सन्मान करते.

माझ्या जीवनावर माझा विश्वास आहे.कदाचीत एकवेळ अशी येईल-बहूदा डॉक्टरांच्या भाकिताच्या पलिकडे जाऊन-ज्यामुळे मला जगताना अत्यानंद व्ह्यायचा तो आनंद कमी होईल.त्यानंतर मात्र माझ्या आई सारखं मी करीन.माझ्या कुटूंबाबरोबरच्या माझ्या आठवणी मी ताज्या करीन.
आणि जो ऐकील त्याला मी सांगेन,
“जीवन असं जगावं की शेवटी पश्चाताप होऊ नये”

किनार्‍यावर एव्हाना खूप काळोख झाला होता.पण चंद्राच्या शितल चांदण्यात आणि त्या थंड वार्‍याच्या
वातावरणात त्यांच्या पत्नीची ही कथा ऐकून माझं मन खूपच उदास झालं .परंतु उद्दा सकाळीच मी गोवं सोडून परत जाणार असल्याने,त्यांची कंपनी पण सोडवत नव्हती.पण काय करणार कुठतरी थांबावं लागतच.

आपले आई वडील वृद्ध होतात तेंव्हा .....


८० वर्षांचे वृद्ध गृहस्थ घरातल्या सोफ्यावर बसले होते. बाजूला त्यांचा ४५ वर्षांचा उच्चशिक्षीत मुलगा बसला होता.खिडकीत एक कावळा येऊन बसला.वडिलांनी मुलाला विचारलं ''ते काय?'' मुलगा म्हणाला ''कावळा'' काही वेळानंतर वडिलांनी पुन्हा विचारलं, ''ते काय?''मुलगा म्हणाला ''आताच सांगितलं ना कावळा आहे म्हणून'' थोड्या वेळेनंतर वडिलांनी मुलाला पुन्हा तोच प्रश्न केला, यावेळेस मात्र मुलगा त्रासला होता.रागातच तो उत्तरला,''कावळा आहे कावळा!'' त्यानंतर चौथ्या वेळेस वडिलांनी तोच प्रश्न पुन्हा विचारला. यावेळेस मुलगा वडिलांवर खेकसलाच'' पुन्हा पुन्हा तोच प्रश्न का विचारता? कितीवेळा सांगितलं कावळा आहे म्हणून? समजत नाही?'' वडिल उठले.त्यांच्या खोलीतून एक डायरी आणली.मुलगा जन्मल्या दिवसापासूनच्या नोंदी त्यात होत्या.त्यातील एक पान उघडून मुलाला वाचायला दिले. मुलगा वाचू लागला, लिहिले होते'' आज माझा तीन वर्षांचा छकुला माझ्यासोबत सोफ्यावर बसला होता.खिडकीत कावळा येऊन बसला.बोबड्या स्वरात मला छकुल्याने २३ वेळा विचारलं, ते काय?२३ वेळा मी त्याला सांगितलं "कावळा".त्याच्या निरागस डोळ्यातली उत्सुकता मला जाणवली

भावनेचा गोंधळ आणि पैशाची मजा


सध्याचे धावपळीचे जीवन हे जरी सर्वदूर पसरलेल्या हृदय अस्वास्थ्याचे मूळ कारण समजले जात असले तरी खरे कारण बेसावधपणे होणारी विचारांची निर्मिती आणि त्यांचे हृदयाला भिडणे हे आहे. हल्ली प्रत्येकाला काही तरी उत्तेजक झाल्या शिवाय जीवनात मजा येते असे वाटतच नाही. माझ्या बोलण्यात जराही अतिशयोक्ती नाही. अठरा मे ला काँग्रेसला बहुमत मिळाल्याचे कळल्यावर शेअर बाजाराचं मूल्य एकदम सहा लाख पन्नास हजार कोटीनं वर गेलं (म्हणजे सहाशे पन्नास वर बारा शून्ये! ). किती लोकांचे किती पैसे शेअर या निव्वळ कल्पनेवर लागले आहेत? खेळ ही निव्वळ कल्पना आहे पण किती कोटी लोकांचे हृदय ट्वेंटी-ट्वेंटीच्या जवळजवळ प्रत्येक बॉलला खालीवर होते? मजा म्हणजे हृदय खालीवर व्हावे म्हणून तर मॅच बघायची! सगळं सरळ आणि सहज झालं तर ती मॅच अजिबात इंटरेस्टींग वाटत नाही. आपली मानसिकता काय दाखवते? हृदय जे केवळ भयाने सक्रिय व्हावे अशी निसर्गाची योजना आहे ते आपल्याला सदैव खालीवर झाल्याशिवाय मजाच येत नाही. माझा एक मित्र मला म्हणाला लोक तुझ्या निराकाराच्या मागे का लागत नाहीत? मी म्हणालो निराकार म्हणजे शांतता, लोकांना शांतता हवी कुठे आहे? शांत आणि मजेत जगणं बेचव वाटतं. हे खरं तर सत्यं शोधणं अवघड वाटण्याचं कारण आहे. लोकांना उत्तेजना (एक्साइटमेंट) म्हणजे आनंद असे वाटते आणि हल्ली अश्या उत्तेजकांचे हरप्रकारे सादरीकरण होते, केव्हाही टिव्ही लावा एकदम भावनेला हात घालणाऱ्या सिरीअल्स किंवा मसालेदार बातम्या (निवेदकांचे आता काय अघटित घडतंय बघाच! अशी उत्सुकता लावणारे आवाज आणि त्याचा सुरेख परिणाम साधावा असे बॅक्ग्राउंड म्युझिक). आता गाण्यासारखी रम्य गोष्ट पण तिथे सुद्धा शेवटी एलिमिनेशनचा थरार हवा नाहीतर पुढचा कार्यक्रम कोण बघणार? आणि टिआरपी कसा वाढणार?

जोडले जाणे हे निराकाराच्या विस्मरणाचे मूळ कारण आहे. विचार ही सुरुवात आहे आणि भावना हे त्याचे सघनी करण आहे. तुम्हाला वावगे वाटेल पण नाती ही माणसाची कल्पना आहे आणि पैसा ही तर निव्वळ विनिमय सोयीचा व्हावा म्हणून माणसाने शोधलेली युक्ती आहे पण ह्या दोन कल्पनांचे विचारांना भावनेत रूपांतरित करण्याचे सामर्थ्य किती महान आहे?

आपण प्रथम नाते ही कल्पना बघू. मुळात विवाह हीच कल्पना आहे (मी सोय, उपयोग, आणि त्याची अनिवार्यता नाकारत नाही) पण ती दोघांनी आणि समजानं मान्य केलेली कल्पना आहे. समाज व्यवस्था टिकावी म्हणून ती कल्पना अनिवार्य देखील आहे पण शेवटी ती कल्पना आहे हे तुम्हीही मान्य कराल. विवाह हीच जर कल्पना आहे तर तिथून आणि त्यातून पुढे निर्माण होणारी सारी नाती कल्पनाच नाहीत का? एकहार्ट म्हणतो 'सी द फंक्शन अँड नॉट द रिलेशन'. कोणत्याही प्रसंगात काय करायचं आहे ते बघा नातं मधे आणू नका. एका क्षणात तुम्ही भावनेच्या सगळ्या गोंधळातून मुक्त होता आणि तरीही प्रसंग अत्यंत समर्थपणे हाताळू शकता. हा भावनेच्या कल्लोळा पासून सुटकेचा एकमेव उपाय आहे. विवाह ही कल्पना आहे ही एक समज विवाहितांना आली तर किती तरी सेपरेशन्स आणि जीवनातले वाद टळू शकतील आणि तरीही समाज व्यवस्था अबाधित राहील.

निराकाराचा बोध म्हणजे सर्व कल्पनांचे निराकरण कारण सगळ्या कल्पना मानसिक आहेत आणि तुमचे व्यक्तिमत्त्व हा सगळ्याचा कल्पना आणि भावनांचा परिपाक आहे.

आता देश ही सुद्धा कल्पना आहे, पृथ्वीवर कोणतीही सीमारेषा नाही, पण माणसाने या एका कल्पनेवर अगदी महाभारता पासून आज पर्यंत जवळजवळ पाच हजार युद्धे खेळली गेली आहेत! महाभारतातून काय मिळवले तर गीता! आणि त्या किमतीला तिचा काय मोठा उपयोग झाला? कारणे काहीही असोत शांतता निर्माण होईल ही शक्यता आजही शून्य आहे! आणि युद्धाचे कारण काय तर देश ही कल्पना. एक मुत्सद्दी कारगील युद्धावरच्या चर्चेत म्हणाला होता की प्रश्न कोणताही असो, रणांगणावर काहीही झाले तरी टेबलावर बसल्या शिवाय तो सुटत नाही हे माणसाला कधी कळणार? असा कल्पनांनी भ्रमित झालेला माणूस शांततेचा शोध कसा घेईल? त्याला डोळ्या समोरचे निराकार कसे दिसेल कारण ते दिसायला चित्त शांत हवे ते अश्या कल्पनेच्या गदारोळात कसे स्थिर राहणार?

आता पैसा ही कल्पना किती जीवन व्यापून आहे आणि किती मानवी कलहांचे कारण आहे हे सर्वज्ञात आहे. असे म्हणतात की पोलीस कुठल्याही गुन्ह्याचा तपास करताना फक्त दोनच शक्यतांवर तपासाची सगळी दिशा ठरवतात, एक : पैसा आणि दुसरे स्त्री! याच अर्थाचे वाक्य कुणीसे म्हटले आहे की पैसा मिळणार नाही असे कळले तर लोक सकाळी बिछान्यातून उठणार देखील नाहीत. आणि लोकांना पैसा ही कल्पना नसून वास्तविकता आहे असे इतके प्रकर्षाने वाटते की पैसा आणि श्वासाची लय याचा फार निकटचा संबंध निर्माण झाला आहे. पैसा हीच जीवनाची सर्वमान्य दिशा असल्यामुळे श्वासाची लय बिघडली तरी हरकत नाही पण पैसा सोडायचा नाही ही मानसिकता झाली आहे. त्यामुळे पैसा ही नुसती कल्पना न राहता तो भावनिक विषय झाला आहे. आता हृदय हालणार नाही तर काय? मुळात जीवनाची धावपळ नाही तर पैशाची ओढ हे हृदयाच्या अस्वस्थतेचं कारण आहे. अशात स्व-विस्मरण होणं किती स्वाभाविक आहे हे तुमच्या लक्ष्यात आलं असेल.

नात्यातील भावनेच्या निराकरणाचा सोपा मार्ग जसा 'सी द फंक्शन अँड नॉट द रिलेशन' हा आहे तसा पैशाच्या बाबतीत 'फील द ब्रेथ अँड नॉट द इश्यू' हा आहे. म्हणजे कोणताही आर्थिक प्रसंग असो फक्त श्वासाची लय सांभाळा तुम्ही तो प्रसंग सहजतेनं हाताळू शकाल. याचं कारण असं आहे की माणसाचा मूळ गैरसमज 'पैसा आहे म्हणून श्वास चालू आहे' हा आहे आणि वास्तविकता अशी आहे की 'श्वास चालू आहे म्हणून पैशाला अर्थ आहे'. आपण पैशालाच 'अर्थ' म्हणून मोकळे झालोत, श्वास महत्त्वाचा होता हे बहुदा शेवटच्या श्वासालाच कळत असावं. आता तुम्हाला बुद्धाच्या विपश्यनेचं महत्त्व कळेल.

हा लेख मी एक सुंदर कथा सांगून संपवतो। एक झेन साधक आपल्या मास्टरला विचारतो 'सिद्ध पुरुषाच फक्त एक लक्षण तुम्ही सांगू शकाल काय? त्यावर हसून तो मास्टर म्हणतो 'चेहऱ्यावर मंद स्मित आणि लयबद्ध चाललेला श्वास!' -संजय क्षीरसागर

प्राथमिकमधील गणिताच्या प्रभावी अध्यापनासाठी

प्राथमिक शिक्षण हा त्यानंतरच्या शिक्षणाचाच काय पण भावी करिअरचाही पाया आहे. त्यातही प्राथमिक स्तरावरील गणिताचे शिक्षण हा त्या पायातील महत्वाचा व आविभाज्य घटक आहे. तर्कशुध्द विचार करण्याची मानसिकता प्रामुख्याने गणिताच्या अध्ययनाने प्राप्त होते. वैज्ञानिक शोधांबाबत असे म्हटले जाते की, “Necessity is the mother of invention.” या वचनामध्ये भर घालावीशी वाटते, “and Mathematics the father.” असेही वचन प्रचलित आहे की, “Mathematics is the queen of all sciences.” कोणत्याही विषयाचे आकलन झाले नाही तर आवड निर्माण होत नाही. गणिताच्या बाबातीत प्राथमिक स्तरावर नेमके हेच घडते आणि पुष्कळसे विद्यार्थी पुढील आयुष्यात, ''आपल्याला बुवा गणित कधी जमलेच नाही,'' अशी तक्रार सांगत बसतात. मधल्या काळातील बरीच मोठी पिढी गणित (आणि इंग्रजीही) सोडून शालान्त परिक्षा पास झाली आणी शैक्षणिक दृष्ट्या बरबादही झाली असे म्हणावयास हरकत नाही. त्यातील काही थोडेसे अजूनही शिक्षकी पेशात आहेत.
बेरीज, वजाबाकी, गुणाकार व भागाकार या चार मुलभूत गणिती प्रक्रीया प्राथमिकच्या पहिल्या तीन इयत्तांत आत्मसात होऊन चौथ्या इयत्तेत विद्यार्थी त्यांत पारंगत (expert) व्हावा अशी अपेक्षा.
बेरीज व वजाबाकी या प्रक्रिया शिकवितांना रंगीत मणी, गोट्या, गुंजा, चिंचोके या आणि अशाच मोजवस्तूंचा उपयोग करावा. त्यानंतर 0 ते 10 या संख्यांच्या सर्व जोड्यांच्या बेरजेचे पाढे तयार करावेत. सरावासाठी वर्तुळाकृती डायलवर 0 ते 19 हे अंक काढून घड्याळाप्रमाणे केंद्राभोवती हाताने फिराविता येणारा काटा असेल अशा अध्यापन साहित्याचा भरपूर उपयोग करावा. (सोबत नमुना जोडला आहे) बेरीज पाढे मुखोदगत व्हावेत; त्यांचा गणन क्रियेत जलदगती व अचूकतेसाठी फार मोठा उपयोग होतो. बेरीज पाढे मुखोद्गत झाल्यानंतर त्यांचा वजाबाकीसाठीसुद्धा चपखलपणे उपयोग होतो. कसा ते पहा : 5+3=8 हा पाढयातील घटक ''पाच आणी तीन, आठ '' किंवा ''पाच नि तीन, आठ '' असा
मुखोद्गत आहे.
बेरजेसाठी : पाच 5
नि तीन + 3
आठ ---------
8

वजाबाकी साठी : पाच 8
नि तीन - 5
आठ -------
3

बेरीजपाढयांसाठी 0 ते केवळ एकक संख्या न घेता 10 या दशक संख्येचाही समावेश केला आहे. त्याचे कारण पुढील उदाहरणे पहा.

758 शाब्दिक प्रक्रिया : तीन नि आठ
+ 293 अकराचे एक हातचा एक नि नऊ दहा -
---------- नि पाच पंधराचे पाच, हातचा एक
1051 नि दोन तीन सात दहा.



962 शाब्दिक प्रक्रिया : सात नि पाच
- 697 बारा, हातचा एक नि नऊ दहा, नि
--------- सहा सोळा, हातचा एक नि सहा सात
265 नि दोन नऊ.

बेरीजपाढे मुखोद्गत झाल्यास त्यांचा गुणाकार व भागाकार शिकण्यासाठी फार मोठा उपयोग होतो. गुणाकार पाढयांची संकल्पना शीकाविल्यानंतर बेरीज प्रक्रियेचा उपयोग करून पुढीलप्रमाणे कितीही पाढे विद्यार्थ्यांना सहज करता येतील.

1 2 3 4 5 6 ३० किंवा कितीही पर्यंत.
2 4 6 8 10 12 प्रत्येक वेळी २ मिळविणे.
3 6 9 12 15 18 प्रत्येक वेळी ३ मिळविणे.
4 8 12 16 20 24 प्रत्येक वेळी 4 मिळविणे.
5 10 15 20 25 30 प्रत्येक वेळी 5 मिळविणे.
6 12 18 24 30 36 प्रत्येक वेळी 6 मिळविणे.
7 14 21 28 35 42 प्रत्येक वेळी 7 मिळविणे.
8 16 24 32 40 48 प्रत्येक वेळी 8 मिळविणे.
9 18 27 36 45 54 प्रत्येक वेळी 9 मिळविणे.
10 20 30 40 50 60 प्रत्येक वेळी 10 मिळविणे.


गुणाकार व भागाकारामध्ये पारंगत होण्यासाठी गुणाकार पाढे उत्कृष्टपणे मुखोद्गत व्हावेत. यासाठी प्रथम सर्व पाढे वरुन खाली, नंतर खालून वरती, त्यानंतर डावीकडून उजवीकडे रांगेने आणि शेवटी उजवीकडून डावीकडे रांगेने असे दररोज एकाग्रतेने वाचून म्हटल्यास आठ दहा दिवसांत चपखलपणे मुखोद्गत व्हावेत. 15X8 विचारले तर वरून खाली 15 चा पाढा न म्हणता झटकन उत्तर यावे.
प्राथमिक स्तरावर गणिताच्या प्रगतीसाठी बेरीज व गुणाकार पाढे पाठांतराला पर्याय नाही हे निश्चित
- ल.रा. दिवेकर

http://www.teachersofindia.org/

जन्म ..


दवाखान्याचा सारा परिसर औषधांच्या वासाने भरलेला। परिचारिकांची मधूनच लगबग चालू होती. एखादा इंटर्नशिप करणारा शिकाऊ डॉक्टर स्थेटास्कोपशी खेळ्त वार्डमध्ये राउंडला जाताना दिसत होता. अविनाश नुकताच एक सिझेरियनची शस्त्रक्रिया आटपून लेबर रूममधून बाहेर पडला होता. बाहेर येऊन तो आरामशीर खुर्चीत बसला. आणि त्याच्या नजरे समोरून काही मिनिटा पुर्वी त्याने केलेली अवघड शस्त्रक्रिया त्याच्या नजरे समोर पुन्हा एकदा दिसू लागली...लेबर रूममध्ये जिवाच्या आकांताने प्रसुती वेदना सहन करणारी स्त्री, डॉक्टराना मदत करण्यासाठी आजूबाजूला उभ्या असलेल्या परिचारिका, आपला सीनियर डॉक्टर काय म्हणतोय हे ऐकण्यासाठी त्याच्याकडे पाहणारी नुकतीच रुजू झालेली त्याची सहयोगी डॉक्टर निशा सारेच तणावाखाली होते. नाही म्हणायला क्षण दोन क्षण तोही तेव्हा विचलित झाला. नैसर्गिक प्रसुती शक्य नसल्यामुळे शस्त्रक्रिया करावी लागणार होती. कापाकापी करावी लागणार या जाणिवेमुळे त्याच्यातील संवेदनशील, हळवा अवी जागा झाला होता. पण ते तेव्हढयापुरतंच. पुढच्याच क्षणी त्याच्यातला डॉक्टर जागा झाला होता. सारं चित्त समोरच्या स्त्रीवर, तिच्या पोटातील बाळाच्या आगमनावर एकाग्र झालं होतं. त्याने हॅण्ड ग्लॉव्ज चढवले. निशाला, परिचारिकाना आवश्यक त्या सूचना देऊन त्याने चेह-यावर मास्क चढवला आणि शस्त्रक्रिया चालू झाली. सारं काही यंत्रवत, जणू ती माणसं नसून नव्या युगातले यंत्र मानव होते. यथावकाश ती शस्त्रक्रिया पूर्ण झाली. त्या बाळाने या जगातला पहिला श्वास घेतला आणि अविनाशनेही निश्वास सोडला. "डॉक्टर काय झालं ?" तो बाहेर पडताच त्या स्त्रीच्या नातेवाईकानी त्याच्याभोवती गर्दी करत विचारलं."मुलगा" समोरच्या लोकांच्या फुललेल्या चेह-याकडे पाहत त्याने आपल्या केबिनची वाट धरली...अवी अचानकपणे भानावर आला. नव्या जीवाचं या जगातील आगमन इतकं आनंददायी असतं, मग आपल्याला कसं काहीच वाटत नाही ? तो स्वताशीच हसला. वेडा आहेस तू... तुझ्यासारख्या प्रसुती तज्ञ कसं समजून घेणार हे सारं... रोज पाच सहा बाळं तुझं बोट धरून या जगात येतात. आणि तसंही तो इवलासा जीव, त्याची या जगाशी जमवून घेण्यासाठी चाललेली धडपड पाहून तुझ्या चेह-यावर स्मित उमटतंच की...सहजच त्याचं लक्ष भिंतीवरच्या हूकला अडकवलेल्या पांढ-या शुभ्र ऍप्रॉनकडे गेलं. तो एकटक गळ्यात लटकणा-या स्टेथास्कोपकडे पाहत राहिला. आपण डॉक्टर व्हावी ही आपली लहानपणापासूनची इच्छा होती. रोगपीडितांची सेवा, डॉक्टर या शब्दाला समाजात असलेला मान, या क्षेत्रात मिळणारा पैसा हे सारं नंतरचं होतं. आपण डॉक्टर व्हावं ही इच्छा मनात घर करून राहण्याचं मुख्य कारण होतं, तेव्हा असलेलं स्टेथास्कोप आणि ऍप्रॉन यांचं आकर्षण. नंतर पुढे समज आल्यावर रोगपीडितांची सेवा हे एकमेव ध्येय समोर ठेऊन त्याने वैदकीय शिक्षण घेतलं. तो बेसीनजवळ आला. ओंजळीत पाणी घेऊन चेहरा आणि हात स्वच्छ धुतले. भिंतीवरील हुकाला अडकावलेल्या टर्किश टॉवेलने पुसले. आता अगदी मोकळं वाटत होतं. त्याने मस्त शिळ घातली अगदी आपण दवाखान्यात आहोत याची पर्वा ना करता. एम बी बी एस, एम डी या सगळ्या पदव्यांपासून आता तो जणू अलिप्त झाला होता. आता तो होता फक्त अविनाश, अवी ... इतक्यात दारावर हलेकेच टकटक झाली..."कम इन..."हातामध्ये चहाचा थर्मास घेऊन निशा आत आली. निशा त्याची सहयोगी डॉक्टर. नुकतीच एम डी होऊन दवाखान्यात रुजू झाली होती. तोही तसा फार वरिष्ठ नव्हता. एम डी होऊन फार तर दीड वर्ष झालं होतं. त्याच्या गुणवत्तेमुळे या नावाजलेल्या दवाखान्याने त्याला संधी दिली होती. डॉक्टर कर्णिकांचा सहाय्यक म्हणून तो काम करत होता. पुढे वर्षभराने डॉक्टर कर्निकांनी जेव्हा दवाखाना सोडला, तेव्हा दवाखान्याच्या व्यवस्थापनाने बाहेरुन कुणी डॉक्टर आणण्याच्या भानगडीत न पडता अविनाशला त्या जागी बसवलं होतं. इतर वरिष्ठ डॉक्टरानी आरडाओरडा केला पण अविनाशची गुणवत्ता, त्याचं कौशल्य वादातीत असल्यामुळे त्याना नमतं घ्यावं लागलं होतं. आणि तो प्रसुती विभागाचा प्रमुख झाला होता. "निशा, एक विचारू ?’"परवानगी कशाला हवी आहे ?""तू हे सारं का करतेस ?""मी समजले नाही डॉक्टर...""मला असं म्हणायचं आहे की, माझ्यासाठी चहा आणणं, माझ्या टेबलावरच्या फुलदानीत रोज ताजी फुलं ठेवणं. आणि या बदल्यात मी तुला काय देतो तर, तू चुकलीस की ओरडा..."'डॉक्टर, तुम्ही माझ्यावर जे ओरडता ते मी शिकावं म्हणूनच ना ? आणि मीही जे करते आहे ते माझ्या वरिष्ठांसाठीच करते आहे, ज्यांच्याबद्दल माझ्या मनात आदर आहे. डॉक्टर, प्रसुती साठी आलेल्या स्त्रीला जेव्हा तुम्ही धीर देता, तेव्हा वाटतं की, अस धीर देणं एक स्त्री असूनही आपल्याला जमणार नाही.""निशा चुकतेस तू. मी कधीही तुला कनिष्ठ मानलं नाही. तुही माझ्यासारखीच डॉक्टर आहेस. लेबररूम मध्ये नर्स जेव्हा बाळाला माझ्या हातात देतात, तेव्हा मी त्या बाळाच्या कानात सांगतो, मोठा जरूर हो, नव्हे तू मोठा होशीलच. परंतु कितीही मोठा झालास तरी इतराना कमी लेखू नको""हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे डॉक्टर."अविनाशने झटकन मान वर करुन निशाकडे पाहीलं. ओठ जरी शांत होते तरीही नजर जे बोलायचं ते बोलून गेली होती. त्याने हलकेच स्नित केलं. निशाही गोड हसली आणि बाहेर पडली. अवी तिच्या पाठमो-या आकृतीकडे एकटक पाहत राहीला.एक दिवस तो असाच आपल्या केबिनमध्ये बसला होता. एक नॉर्मल डीलीव्हरीची केस निशा पाहणार होती. त्यामुळे अगदी निवांत चालू होतं सारं. इतक्यात फोनची रींग वाजली. त्याने फोन उचलला. ’हेलो. मी डॉ. आविनाशशी बोलू शकते का?" आवाज स्त्रीचा होता. त्याने आवाज ओळखण्याचा प्रयत्न केला. जमेना. शेवटी त्यानेच तिची ओळख विचारली."मीच डॉ. आविनाश. आपण कोण?""वैष्णवी"अवी स्तब्ध झाला. त्याला काय बोलावे हे सुचेना. रिसीव्हर पकडलेला हात निर्जीव झाला आहे असंच क्षणभर त्याला वाटलं.त्या फोनवरच्या मुलीने आपलं बोलणं पुढे चालू ठेवलं."अवी, मला तुला भेटायचं आहे""...""अवी, काय झालं? ऐकतोयस ना मी काय म्हणतेय ते? उदया संध्याकाळी पाच वाजता मी तुझी तुझ्या दवाखान्यासमोरच्या रेस्टॉरंटमध्ये वाट पाहीन. चालेल ना?""हो" त्याच्याही नकळत तो हो म्हणून गेला होता.वैष्णवी. तो स्वत:शीच पुटपुटला. अन तो कधी भुतकाळात हरवला हे त्याचं त्यालाच कळलं नाही.वैष्णवी त्याची शाळेतील मैत्रिण. म्हणजे एकाच वर्गातील म्हणून मैत्रिण म्हणायची नाही तर ती त्याच्याकडे पाहतही नसे. पुढे अकरावी बारावीला असताना त्याला तिच्याबददल कधी आणि कशी ओढ वाटायला लागली हे त्याला कळलंच नाही. त्यानं तिला विचारलंही. पण तिच्या आणि त्याच्या घरच्या परिस्थितीमध्ये फरक असल्यामुळे तीने त्याला नाही म्हटलं. श्रिमंत नायिका आणी गरीब नायक हे फक्त कथा कादंब-यांमधेच शोभून दिसतात. तिचा नकार त्याने फारसा मनावर घेतला नाही. तसा तो जात्याच हुशार होता. बारावीला जीव तोडून अभ्यास केला. फ्रीशीपवर मेडिकलला गेला. पुढे कधीतरी तो एम बी बी एसला असताना वैष्णवी त्याला दिसली होती. पुन्हा एकदा त्याच्या मनातील तिच्याबददलच्या विचारांनी उचल खाल्ली. त्याने पुन्हा एकदा तिला विचारायचं ठरवलं. आपण आता मेडीकलला आहोत. अजुन दोनेक वर्षांनी डॉक्टर होऊ.त्यामुळे आता तरी ती आपल्याला नाही म्हणणार नाही असं त्याला वाटत होतं. आणि पुन्हा एकदा त्याची निराशा झाली होती. तिचं त्याच्याच वर्गातील एका मुलावर प्रेम होतं. हा घाव मात्र त्याच्या जिव्हारी बसला होता. पुरता कोलमडून गेला होता तो. ना त्याचं अभ्यासात मन लागत होतं, ना अन्नपाणी गोड लागत होतं. मित्रांनी कसंबसं सावरलं त्याला. त्यानेही स्वत:ला समजावलं. तिला जर तुझ्याबददल काही वाटत नाही तर तू तरी का एव्हढं वाईट वाटून घ्यावंस? जगात काय तिच एक मुलगी आहे? तुला दुसरी कुणी भेटणारच नाही का? तो पुन्हा अभ्यासात रमला. एम बी बी एस झाला. गायनॅकॉलॉजी घेऊन एम डी सुदधा केलं त्याने. आता तो स्थिरावला होता. रोज पाच सहा बाळं त्याचं बोट धरून या जगात येत होती. त्या बाळांच्या आया त्याला दुवा देत होत्या. निशाच्या रुपाने त्याला सहाय्यकच नव्हे तर एक चांगली मैत्रिणही मिळाली होती. आणि आज अचानक वैष्णवीचा फोन आला होता. जवळजवळ चार वर्षांनी तिचा आवाज त्याच्या कानी पडत होता. काय बोलायचं असेल तिला आपल्याशी? कशी दिसत असेल आता ती? आपण थोडे अस्वस्थ झाले आहोत हे जाणवताच तो स्वत:शीच हसला. विचार करण्याची गरज नव्हती. घोडामैदान जवळच होतं. ठरल्याप्रमाणे दुस-या दिवशी संध्याकाळी तो तिला भेटायला गेला. तिला पाहताच तो आश्च्रर्यचकित झाला. ती अजुनही तशीच दिसत होती जशी चार वर्षांपूर्वी होती."कशी आहेस?""ठीक आहे. तू कसा आहेस?""भला एक डॉक्टर कसा आहेस या प्रश्नाला काय उत्तर देईल?" ती हसली. त्याने आपलं बोलणं पुढे चालू ठेवलं."काय घेणार?""म्हणजे...?" "आपण रेस्टॉरंटमध्ये आहोत""सॉरी अवी. माझ्या लक्षातच राहीलं नाही. मला कुठलंही कोल्ड्रींक चालेल""बोल. काय बोलणार होतीस?" त्याने थंडा पित पित तिला विचारलं."अवी..." तिचे शब्द ओठातच अडखळले."वैष्णवी, एकदा बोलायचं म्हटल्यावर अडखळू नये माणसानं. अगदी मोकळेपणानं बोलावं.""अवी, माझ्या घरचे माझ्यासाठी मुलगा पाहत आहेत.""पण तुझं तर प्रेम आहे कुठल्यातरी मुलावर?""अवी, ते प्रेम नव्हतं. आकर्षण होतं. वेडं वय होतं. वाहवत गेले दिखाव्याबरोबर. पुढे जाणवलं की त्याच्याबरोबर आयुष्य काढणं जमणार नाही. त्यामुळे मी स्वत:हून त्याच्याबरोबरच नातं तोडलं.""चांगलं झालं. आणि आता तसंही तुझ्या घरचे तुझ्यासाठी मुलगा पाहत आहेतच की""अवी तसं नाही रे. एक विचारू मी तुला?""हो. विचार ना.""आर यु एंगेज्ड? आय मीन तुझं लग्न वगैरे ठरलंय का किंवा कुणा मुलीवर प्रेम आहे वगैरे?""उत्तर दिलंच पाहिजे का?" तीने ज्या पदधतीने ते विचारलं होतं ते त्याला बिलकुल आवडलं नव्हतं."उत्तर दयावं अशी अपेक्षा आहे."उत्तर दयायला अवी बांधलेला नव्हता. तरीही त्याने मनात चाचपणी सुरु केली. हीने आपल्याला नाकारल्यानंतर आपल्याला कधी कुणाची ओढ वाटली होती का? नाही. असं काही नाही. आणि हे तो स्वताच्या मनाशीच ठसवत असताना नकळत निशाचा चेहरा त्याच्या नजरेसमोर तरळला. आपल्याला निशाबददल "तसं" काही वाटतंय का? आणि पुढच्या क्षणी त्याला कळून चुकलं होतं, या प्रश्नाचं उत्तर ईतकं सहजा सहजी मिळणार नव्हतं. "वैष्णवी, माझं फक्त तुझ्यावर प्रेम होतं. तू मला नाही म्हटल्यावर मी कधी कुठल्या मुलीचा विचार केला नव्हता. आज मी माझं आयुष्य सुखाने जगतोय. एक डॉक्टर म्हणून मी करीयरच्या बाबतीत समाधानी आहे. जोडीदार, लग्न या गोष्टींचा विचार अजुनतरी माझ्या मनात आलेला नाही. जेव्हा येईल तेव्हा पाहीन मी काय करायचं ते. पण तू हा प्रश्न मला आता विचारायचं कारण काय?""अवी, मला तुझी जोडीदार म्हणून स्विकारशील?""काय?" अवी तिच्या या प्रश्नाने दचकला होता."अवी, मी तुला असं म्हणत नाही की तू माझा स्विकार कर. मला कुणाबरोबर तरी लग्न करावंच लागणार आहे. तू मला दोनदा विचारलं होतंस म्हणून... मला माफ कर अवी जर तुला माझं बोलणं आवडलं नसेल तर"अवी विचारमग्न झाला. नियती किती अजब गोष्ट आहे. आपण जेव्हा हिच्यासाठी रात्र रात्र रडत होतो तेव्हा हीं आपल्याकडे ढुंकुनही पाहत नव्हती. आणि आज...हिला केवळ दुस-या कुणाबरोबर लग्न करायचं आहे तर ती माझ्याकडे आली आहे. याचाच दुसरा अर्थ असा की ती माझ्याकडे एक पर्याय म्हणून आली आहे. तिला माझ्याबददल काही वाटतंय म्हणून नाही. जर खरंच तिला माझ्याबददल काही वाटत असतं कदाचित तिनं स्वताला सावरलं असतं आणि माझ्यापर्यंत आलीच नसती.हिच्या अगदी उलट निशा आहे. तीचं आपल्यावर प्रेम असेल किंवा नाही हे नाही सांगता येणार. पण तीची आपल्यावर माया आहे एव्हढं मात्र नक्की. आपण दवाखान्यात असताना सतत आपल्या मागे पुढे असते. आपल्याला काय हवं नको ते पाहते. आणि हे सारं करताना तीची आपल्याकडून काहीच अपेक्षा नसते. किती फरक आहे दोघींमध्ये. अवीला वैष्णवीच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं असतं."वैष्णवी, का ते मी तुला नाही सांगू शकणार पण... मी तुझ्याबरोबर लग्न नाही करता येणार. तू तुझ्या घरच्यांनी पाहीलेल्या एखादया चांगल्या मुलाबरोबर लग्न कर आणि सुखी हो." त्याने एका दमात बोलून टाकलं. मान वर करुन वैष्णवीकडे पाहीलं. तिचे डोळे पाण्याने ओलावले होते. पण त्याचाही नाईलाज होता."चल निघुया आपण. बराच वेळ झाला आहे." आणि दोघेही दोन वेगळ्या वाटेने चालू लागले......आज पुन्हा एकदा अवीने सिझेरीयन करून एका बाळाला या दुनियेत आणलं. सिझेरीयन केल्यानंतर तो जसा नेहमी थोडासा उदास होत असा तसा आजही झाला होता. आणि आज का कोण जाणे त्याला त्या दिवशीचा वैष्णवीसोबतचा प्रसंग आठवला. थोडासा अस्वस्थ मनानेच तो आपल्या केबिनमध्ये आला. त्याचं काही तरी बिनसलं आहे हे जाणवून निशाही त्याच्या पाठोपाठ आली."डॉक्टर, काय झालं?""काही नाही गं. नेहमीचंच. पोस्ट सिझेरीयन उदासीनता." त्याने चेह-यावर हसू आणण्याचा केविलवाणा प्रयत्न केला."अवी काय झालंय? मलाही नाही सांगणार?" कधीतरी निशा त्याला नावाने हाक मारायची. विशेषत: तो जेव्हा नर्व्हस असेल तेव्हा. त्याने तिच्या नजरेला भीडवली. एक वेगळीच आश्वासकता तिच्या नजरेत त्याला दिसली. आणि त्याने तिला सारं काही सांगून टाकलं. "हम्म... पुढे काय?" त्याचं सांगून होताच तिने खेळकर चेह-याने त्याला विचारलं. "निशा, मस्करी करतेयस ना माझी?""नाही हो डॉक्टर. मला त्या तुमच्या हीरॉईनचं हसायला येतंय. कुणाबरोबर तरी लग्न करायचंच आहे ना म्हणून तू. वा,काय मुलगी आहे. आणि तुम्ही कधी काळी अशा मुलीवर प्रेम केलं होतं.""निशा. त्या वयात होतं गं असं. चांगलं वाईट असा विचार करण्याचं ते वय नसतं. कुणीतरी आपलं असावं एव्हढी एकच भावना मनात असते.""कळलं. जाऊ दया. विसरा आता ते. तुमच्या सारख्या गुणी, हुषार डॉक्टरला खुप चांगली मुलगी आयुष्याचा जोडीदार म्हणून मिळेल.""तशी एक चांगली मुलगी आता माझ्यासमोर उभी आहे.""डॉक्टर, आता तुम्ही माझी मस्करी करताय.""नाही निशा. मी अगदी मनापासून बोलतोय. होशील माझ्या आयुष्याचा जोडीदार?" त्याने ती काय उत्तर देते म्हनून निशाकडे पाहीलं. निशाचा चेहरा लाजेनं लाल झाला होता. "निशा बोल ना.""अवी, सारं काही मीच सांगायला हवं का रे. समजून घे की तू थोडंसं" ती अलगदपणे त्याच्या मिठीत विसावली. दोन प्रसुतीतज्ञांच्या प्रेमाने त्या मिठीत जन्म घेतला होता...

बोधकथा - दोन मनांतील अंतर


एकदा एका साधुने त्याच्या शिष्यांना विचारले, " आपण रागात असताना जोरात ओरडतो किंवा कोणाशी भांडण झाले असल्यास आपोआप आपला आवाज वाढतो, असे का?". सर्व शिष्य विचार करु लागले. एक शिष्याने उत्तर दीले, "रागावलेले असताना आपण स्वतःवरचे नियंत्रण हरवुन बसतो, आणि म्हणुनच कदाचीत ओरडून बोलतो."
यावर साधुमहाराज म्हणाले, " पण ज्या व्यक्तीवर आपण रागावलेले असतो ती समोरच असते तरीसुध्दा आपण ओरडतो। जरी सौम्य आणि मृदु आवाजात बोलणे शक्य असले तरीदेखील रागात आपण चढ्या आवाजातच बोलतो". यावर सर्व शिष्यांनी विचार केला आणि आपापल्या परीने उत्तर देण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणत्याच उत्तराने साधुचे समाधान झाले नाही. शेवटी साधुमहाराजांनी स्वतःच उत्तर दीले. ते म्हणाले , " जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांवर रागावलेल्या असतात तेव्हा त्यांच्या मनांमध्ये अंतर वाढलेले असते आणि हेच अंतर भरुन काढण्याकरीता ते चढया आवाजात बोलतात."
"आता मला सांगा की जेव्हा दोन व्यक्ती परस्परांच्या प्रेमात असतात तेव्हा अतीशय हळू आणि शांतपणे बोलतात, असे का?" असा प्रश्न विचारुन मग स्वतःच उत्तर देत ते म्हणाले," कारण त्यांची मनं जवळ आलेली असतात. दोन मनांतील अंतर कमी झालेले असते.
आणि जसजसे दोन व्यक्तीमधील प्रेम वाढु लागते तसतसे त्यांच्यातील संवाद इतका सुलभ होउन जातो की सर्वच गोष्टी बोलण्याची देखील आवश्यकताच भासत नाही. फक्त नजरेतुनच किंवा देहबोलीतुनच ते आपल्या साथीदाराला काय म्हणायचे आहे ते ओळखतात.
शिकवण - परस्परांत वादविवाद आणि भांडणतंटे होतच राहतात मात्र कीतीही वादविवाद असला तरी मनामनातील अंतर वाढु देउ नका। तसे होउ दील्यास दोन व्यक्तींमधील दरी इतकी मोठी होइल की पुन्हा ती मिटवणे कधीच शक्य होणार नाही.

शेअर बाजार


मी गुंतवणूक शेअर बाजारात करावी काय?

खरोखरच हा महत्वाचा प्रश्न आहे.

शेअर मार्केट जेव्हा पूर्णपणे तेजीत असते जसे की २००४ ते २००७ जवळपास प्रत्येकालाच शेअर मार्केट मधून भरघोस नफा मिळाला. पण किती जणानी तो खिशात घातला? फारच थोड्यानी.
कारण वेळीच नफ्यात असताना विक्री करत नाही.
उगाचच एखाद्या शेअरच्या प्रेमात पडतो.
आपल्याला वाटत की आपल्याला शेअर बाजारातल बरच काही कळत. पण खरच काहो आपल्याला कळत? स्वतःलाच प्रामाणिकपणे विचारा उत्तर मिळेल.
(आणि ज्याना खरच शेअर बाजारातिल कळतं त्यांचेसाठी या कोणाची गरजच नाही).
आपल्याकडे पुरेसे रिसर्च नसते.
मार्केट टायमिंग बरेच वेळा चुकत.

अशी अनेक कारण असतात आणि म्हणूनच ९०% पेक्षा जास्त जणाना नुकसानच होते.

डे-ट्रेडिंग - नकोरे बाबा - खर म्हणजे अजिबात करु नये. तो एक जुगारच आहे. आणि
जुगारात किती जणाना बरं पैसे मिळाले आहेत.

मग काय करावे शेअर बाजारात पैसे गुतवूच नयेत काय?
जरुर गुंतवावेत पण असे व इतकेच पैसे जे आपणाला दिर्घ मुदतिसाठी ठेवता येतिल, ज्याचेवर आपली कोणतिहि गोष्ट नजिकचे काळात अवलंबून नसेल. कधीही कर्ज काढून शेअर बाजारात गुंतवणूक कधीच करु नये. तसेच कोणाच्याहि टिपवर गुंतवणूक करु नये.

सर्वात उत्तम म्हणजे म्युचल फंडच आपल्यासारख्या सामान्य लोकाना फार चांगला. नोकरि पेशातिल माणसाने एकदम एकरकमी गुंतवणूकि ऐवजी दरमहा ठराविक रक्कम SIP द्वारे गुंतवावी.

शेअर बाजारात सर्व सामान्य माणसाने किती पैसे गुंतवावेत?
खर म्हणजे हे ज्याचे त्याचे धोका स्वीकारण्यावर अवलंबून असते.
एक तत्व म्हणून सांगावयाचे झाल्यास अस सांगता येइल आपण जेवढि बचत करतो त्यापैकि आपल्या चालू वयाचे टक्केवारिएवढी रक्कम सुरक्षीत प्रकारात गुंतवावेत आणि १०० वजा चालू वय येणारे टक्केवारिएवढी रक्कम म्युचल फंडाचे माध्यमातून शेअर बाजारात गुंतवावी.

म्युचल फंडात गुंतवणूक केल्यामुळे मिळणारे लाभ

तुम्हाला तज्ञांचे मार्गदर्शन मिळतं
प्रत्येक म्युचल फंड हाउस त्यांचे फंड व्यवस्थापनेसाठी अनेक फंड मॅनेजर्स व फंड मॅनेजरला सहाय्य करण्यासाठी रिसर्च टिम व व्यावसाइक तज्ञ यांची नेमणूक करत असतात जे तुमच्यासाठी सतत आर्थिक बाजारपेठेवर लक्ष ठेऊन असतात. ते विविध क्षेत्रातील आणि कंपन्यांमधिल मार्केट ट्रेंडस व भावी संभाव्यता यांच संशोधन नियमितपणे करत असतात. आपले रिसर्च रिपोर्ट संबधित स्किमचे फंड मॅनेजरला सादर करत असतात त्यानंतर संबधित फंड मॅनेजर तुलनात्मक अभ्यास करुन गुंतवणूकीचा अंतिम निर्णय घेत असत या तज्ञांमुळे गुंतवणूकीचा योग्य निर्णय घेता येत असतो. तस तुम्हाला एकट्याने करणे कठिण होतं आणि म्हणूनच ९०% पेंक्षा जास्त गुंतवणूकदार शेअर मार्केट मधे नुकसान सोसत असताना म्युचल फंडाचे नियमित गुंतवणूकदार मात्र दिर्घ मुदतित मोठा लाभ मिळवित असतात.

कमी जोखिम
म्युचल फंडाची खासियत म्हणजे त्यात गुंतवणूकीच्या अनेक संधी मिळतात. सामान्यपणे एकाच सिक्युरिटीतील गुंतवणूक ती कंपनी किती चांगला किंवा वाईट व्यवसाय करते यावर अवलंबून असते. पण म्युचल फंडात तुम्ही रुपये ५००० गुंतवा अथवा रुपये पाच लाख गुंतवा त्यातिल थोडी थोडी रक्कम वेगवेगळ्या अनेक कंपन्यांचे शेअर्स मधे गुंतविली जात असते जेणेकरुन तुमच्या गुंतवणूकीची जोखिम कमी होते.

तुम्हाला आवश्यक तेव्हा पैसे काढून घेण्याची सुविधा असते
ओपन एंडेड म्युचल फंड स्किमस् या बॅंकेतिल सेव्हींग खात्याप्रमाणे चालविता येत असतात म्हणजेच यात केव्हाही पैसे भरता येतात व केव्हाही काढता येतात. क्लोज एंडेड स्किम मधे केलेली गुंतवणूक काढण्यावर मात्र काही निर्बंध असतात आणि म्हणूनच बरेच तज्ञांशी सहमत होताना आम्हीसुध्दा ओपन एंडेड म्युचल फंड स्किमस् मधे गुंतवणूकीचा सल्ला देत असतो.

कमीत कमी खर्च
तुम्ही इतर अनेक गुंतवणूकदारांसोबत गुंतवणूक करत असल्यामुळे तुम्हाला तुलनात्मकदॄष्ट्या गुंतवणूकीचा खर्च कमी करावा लागतो. जर तुम्ही एकट्याने गुंतवणूक केली असती तर हा खर्च वाढला असता म्हणूनच भांडवली बाजारात थेट गुंतवणूकीपेक्षा म्युचल फंडात गुंतवणूक करायला कमी खर्च येतो.

पारदर्शकता
जमिनजुमल्यातिल गुंतवणूकीत जे शक्य होत नाही ते यात शक्य होतं. यात गुंतवणूकीचे मुल्य रोजच्या रोज जाणून घेता येते शिवाय ठराविक काळानंतर बहूधा प्रत्येक महिन्याचे अखेरीला सर्वच फंड हाऊसेस त्यांची फॅक्ट शिट प्रकाशित करत असतात जीचे आधारे तुम्ही म्युचल फंडात केलेली गुंतवणूक कोणकोणत्या कंपन्यांचे शेअर्समधे गुंतविली आहे. विविध प्रकारच्या अन्य कोणत्या ठीकाणी केलेल्या आहेत तसेच फंड मॅनेजरचे धोरणही तुम्ही ठरावीक कालावधीनंतर जाणून घेऊ शकता.

इंकम टॅक्स मुक्त परतावे
इक्वीटी म्युचल फंडावरील मिळणारे लाभांश हे पूर्णता करमुक्त असतात. शिवाय इक्वीटी म्युचल फंडात केलेली गुंतवणूक एक वर्षानंतर काढली असता पूर्णतः करमुक्त असते.

सेबी व अम्फिचे नियंत्रण
सर्व म्युचल फंड हे Security & Exchange Board of India (सेबी) आणि Association of Mutual Funds of India (AMFI) कडे नोंदणीकॄत असतात आणि गुंतवणूकदारांचे हित सांभाळणा-या तरतुदी व नियमांनुसार काम करत असतात. सेबीकडून स्टॉक एक्सचेंज आणि त्यांच्या सहचालकांवर नियंत्रण तर ठेवले जातेच शिवाय चुकीच्या सहचालनावर दंड ठोठाउन सिक्युरिटी मार्केट व सिक्युरिटी व्यवहारातील भ्रष्टाचाराला पायबंद घालते.

म्युचल फंड गुंतवणूकीव्दारा दिर्घ मुदतित संपत्ति निर्माण होवू शकेल याची कारणेः
• भारतिय अर्थव्यवस्था हि जगात अत्यंत वेगाने पुढे जात आहे हे सर्वमान्य सत्य आहे.
• परकिय गुंतवणूकदार नियमितपणे भारतिय अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवणूक करित आहेत.
• अनेक सेझ मंजूर झाले आहेत व भविष्यात ते कार्यरत होतिल.
• येत्या ५ ते ७ वर्षात पायाभूत सुविधा विभागात जसे की पॉवर, रस्ते, धरणे, पाणी योजना, टेलिकम्युनिकेशन इ अनेक उद्योग धंद्यात मोठ्याप्रमाणावर गुंतवणूक करण्याचे सरकारी व योजना आयोगाचे निर्णय झाले आहेत.
• सर्वच विभागात उद्योग धंद्याना पोषक वातावरण आहे.
• जीडिपी स्थीर आहे व पूढे वाढ अपेक्षीत आहे.
• काम करणा-या भारतियांचे सरासरी वय फक्त ३५ आहे.
• सद्या देशातिल एकूण गुंतवणूकीपैकी नगण्य म्हणजे ३ टक्के पेक्षा कमी गुंतवणूक म्युचल फंडात आहे.
• उद्योगधंद्याला पुरक असे सरकारी धोरण आहे.
• शेती व शेतीला पुरक उद्योगधंद्याला पुरक असे सरकारी धोरण आहे.
• अनेक परदेशी कंपन्यांचे काम भारतिय कंपन्या करत आहेत.
• भारतिय शेअर बाजार अद्यावत आहे व त्यावर उत्तम नियंत्रक म्हणून सेबी व रिझर्व्ह बॅंक काम करत आहेत.
• भारतिय अर्थसंस्था व उद्योगधंद्यावर उत्तम नियंत्रक म्हणून सेबी व रिझर्व्ह बॅंक काम करत आहेत.
गुजराथी समाजाने शेअर बाजार व म्युचल फंडाचे माध्यमातून भरपूर संपत्ति निर्माण केली आहे आपण मराठी माणसानेच का मागे रहावे.

ज्यानी रिलायन्स ग्रोथ फंडाच्या ग्रोथ ओप्शनमधे डिसेंबर १९९५ पासून दरमहा रुपये एक हजार मत्र गुंतवले आहेत आज त्याची व्हॅल्यू आहे २० लाख रुपये.

तुम्हाला खरं वाटत नसल तर रिलायन्स म्युचल फंडाच्या खालील संकेत स्थळावर जाउन खात्री करुन घ्या.

http://www.reliancemutual.com/Reliancesip/

प्रथमतः वरील संकेत स्थळावर गेल्यावर रिलायन्स ग्रोथ फंडाच्या ग्रोथ ओप्शन ड्रॉपडाउन मेनूमधून सिलेक्ट करा.

नंतर इंस्टॉलमेंट मधे तुम्हाला जेवढी बचत दरमहा करणे शक्य असेल तेवढी लिहा उदा १००००

नंतर पिरियड मधे मन्थलि सिलेक्ट करा.

नंतर फ्रॉम मधे प्रथमतः वर्ष १९९५ निवडा मग तुमहाला शक्य ती प्रत्येक महिन्याची तारिख बाजुचया कॅलेंडर मधुन निवडा 2 किंवा 10 किंवा 18 किंवा 28 तारिख लिहा.

नंतर टू मधे २००९ सालातील पहिली निवडलेली चालू महिन्यातील तारीख निवडा.

व्हॅल्यू तारीख आजची निवडा आणि व्ह्यू वर टिचकी मारा - तुमच्यासमोर गुंतवणूकीचा चार्टच येइल व शेवटी खाली आजची किंमत दिसेल.

आता तुमहीच ठरवा गुंतवणूक कोठे करणे फायदेशिर ते.

एक मात्र लक्षात ठेवा म्युचल फंडात पैसे गुंवताना दिर्घ काळासाठीच करा. शॉर्ट टर्म मधे काहिही होवू शकते पण दिर्घ मुदतित फायदाच होतो. दिर्घ मुदत म्हणजे किमान ५ ते १५ वर्ष.

सर्वोत्तम पर्याय दरमहा नियमित गुंतवणूक पर्यानिवडणे व पुढील तारखेचे चेक अथवा आटो डेबीट फॉर्म भरुन देणे।

-

धर्मवीर संभाजी महाराज


औरंगजेबाला २७ वर्षे उत्तर हिंदुस्थानापासून दूर ठेवणारे संभाजीराजे



संभाजी महाराज

संभाजीराजांनी जी अलौकिक कामे त्यांच्या अल्पायुष्यात केली, त्याचा दूरगामी परिणाम संपूर्ण हिंदुस्थानावर झाला. त्यामुळे त्यांच्याविषयी प्रत्येक हिंदु बांधवाने कृतज्ञ राहिले पाहिजे. त्यांनी औरंगजेबाच्या आठ लाख सैन्याला न डगमगता तोंड दिले आणि कित्येक मोगल सरदारांना लढाईत पराभूत करून त्यांना पळता भूई थोडी केली. त्यामुळे औरंगजेब दीर्घकाळ महाराष्ट्रात लढत राहिला आणि संपूर्ण उत्तर हिंदुस्थान त्याच्या दडपणापासून मुक्‍त राहिला. ही संभाजीराजांची सगळयात मोठी कामगिरी म्हणावी लागेल. त्यांनी औरंगजेबाबरोबर तह केला असता, त्याचे मांडलिकत्व स्वीकारले असते, तर तो दोन-तीन वर्षांत पुन्हा उत्तरेत गेला असता; परंतु संभाजीराजांच्या संघर्षामुळे २७ वर्षे औरंगजेब दक्षिणेत अडकून राहिला आणि त्यामुळे उत्तरेत बुंदेलखंड, पंजाब आणि राजस्थान या ठिकाणी हिंदूंच्या नवीन सत्ता उदयाला येऊन हिंदु समाजाला सुरक्षितता लाभली.

संभाजीराजांच्या सामर्थ्याची पोर्तुगिजांना भीती
संभाजीराजांनी गोव्यावर आक्रमण करून धर्मवेड्या पोर्तुगिजांना नमवले. त्यांच्याशी तह करून त्यांना बांधून टाकले. गोव्यातील पोर्तुगिजांच्या धर्मप्रसाराला संभाजीराजांनी पायबंद घातला, त्यामुळे गोवा प्रदेशातील हिंदूंचे रक्षण झाले, हे विसरणे अशक्य आहे. पोर्तुगीज संभाजीराजांना प्रचंड भीत असत. त्यांनी इंग्रजांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे, ``सध्याच्या परिस्थितीत संभाजी महाराज हेच सर्वशक्‍तीमान आहेत, असा आमचा अनुभव आहे !'' शत्रूचे हे प्रमाणपत्र महाराजांच्या सामर्थ्याविषयी कल्पना देणारे आहे.

हिंदूंच्या शुद्धीकरणासाठी सदैव दक्ष असलेले संभाजी महाराज !
शिवाजी महाराजांनी नेताजी पालकर यांना पुन्हा हिंदु धर्मात घेतल्याची हकिकत सर्वांना माहीत आहेच; परंतु संभाजीराजांनी `शुुद्धीकरणासाठी' आपल्या राज्यात स्वतंत्र विभाग स्थापन केला, हे विशेष महत्त्वाचे आहे. हरसूल गावच्या कुलकर्णी आडनावाच्या ब्राह्मणाची कथा संभाजीराजांच्या इतिहासात नोंदवलेली आहे. जबरदस्तीमुळे मुसलमान झालेला हा कुलकर्णी हिंदु धर्मात परत येण्यासाठी खूप प्रयत्‍न करत होता; परंतु स्थानिक ब्राह्मण त्याला दाद देत नव्हते. शेवटी हा ब्राह्मण संभाजीराजांना त्या धामधुमीच्या काळात भेटला आणि त्याने आपली व्यथा आपल्या राजासमोर मांडली. महाराजांनी ताबडतोब त्याच्या शुुद्धीकरणाची व्यवस्था करून पुन्हा त्याला स्वधर्मात प्रवेश दिला. राजांच्या उदार धोरणामुळे कित्येक हिंदू पुन्हा स्वधर्मात आले !

संभाजीराजांचा जाज्वल्य धर्माभिमान !
संभाजीराजांच्या बलीदानाचा इतिहास लोकांना नीट माहीत नाही. १ फेब्रुवारी १६८९ या दिवशी सख्खा मेहुणा गणोजी शिर्के याच्या फितुरीमुळे संगमेश्वर या ठिकाणी संभाजीराजे काही वतनदारांची गाऱ्हाणी ऐकत असतांना पकडले गेले. त्या वेळी मोगलांनी लाखो सैनिकांच्या बंदोबस्तात राजांची धिंड काढली. त्यांना शारीरिक आणि मानसिक यातना दिल्या. विदूषकाचा पोषाख घालून, लाकडी सापळयात हातपाय अडकवण्यात आले. रक्‍तबंबाळ अवस्थेतील संभाजीराजांचे तत्कालीन चित्रकाराने रंगवलेले चित्र नगर येथील संग्रहालयात आजही आहे. असंख्य यातना सहन करणार्‍या या तेजस्वी हिंदु राजाची नजर अत्यंत क्रुद्ध आहे, असे त्या चित्रात दिसते. संभाजीराजांच्या स्वाभिमानाचा परिचय त्या क्रुद्ध नजरेवरूनच होतो.
१५ फेब्रुवारी १६८९ या दिवशी औरंगजेबाबरोबर राजांची दृष्टीभेट पेडगावच्या किल्ल्यात झाली. `काफिरांचा राजा सापडला' म्हणून औरंगजेबाने नमाज पढून अल्लाचे आभार मानून अत्यानंद व्यक्‍त केला. त्या वेळी संभाजीराजांना औरंगजेबाचा वजीर इरवलासखान याने शरण येण्याचे आवाहन केले. संतप्‍त संभाजीराजांनी औरंगजेबाला मुजरा करण्यास नकार दिला. तो एकनिर्णायक क्षण होता. महाराजांनी वैयक्‍तिक सुखाच्या अभिलाषेपेक्षा हिंदुत्वाचा अभिमान महत्त्वाचा मानला. आपल्या वडिलांनी निर्माण केलेली स्वाभिमानाची महान परंपरा त्यांनी जपली. यानंतर दोन दिवसांत औरंगजेबाच्या अनेक सरदारांनी त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्‍न केला. त्यांना `मुसलमान झाल्यास जीवदान मिळेल', असे सांगण्यात आले; परंतु स्वाभिमानी संभाजीराजांनी या मुसलमान सरदारांचा सतत अपमान केला.

धर्मासाठी बलीदान करून इतिहासात अमर झालेले शंभूराजे
शेवटी पापी औरंग्याने त्यांचे डोळे फोडले, जीभ छाटली तरीही राजांना मृत्यू स्पर्श करू शकला नाही. दुष्ट मोगल सरदारांनी त्यांना प्रचंड यातना दिल्या. त्यांच्या दिव्य धर्माभिमानाबद्दल त्यांना हे सारे भोगावेच लागले. १२ मार्च १६८९ या दिवशी गुढीपाडवा होता. हिंदूंच्या सणाच्या दिवशी त्यांचा अपमान करण्यासाठी ११ मार्चच्या फाल्गुन अमावस्येला संभाजीराजांची हत्या करण्यात आली. भाल्याला त्यांचे मस्तक टोचून मोगलांनी त्याची धिंड काढली. अशा प्रकारे १ फेब्रुवारी ते ११ मार्च असे ३९ दिवस यमयातना सहन करून संभाजीराजांनी हिंदुत्वाचे तेज वाढवले. धर्मासाठी बलीदान करणारा हा राजा इतिहासात अमर झाला. औरंगजेब मात्र राजधर्म पायदळी तुडवणारा इतिहासाच्या दरबारातील गुन्हेगार ठरला.

संभाजीराजांच्या बलीदानानंतर महाराष्ट्रात क्रांती घडली
संभाजीराजांच्या या बलीदानामुळे संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आणि पापी औरंग्याबरोबर मराठ्यांचा निर्णायक संघर्ष सुरू झाला. `गवताला भाले फुटले आणि घराघरांचे किल्ले झाले, घराघरातील माता-भगिनी आपल्या मर्दाला राजाच्या हत्येचा सूड घ्यायला सांगू लागल्या', असे त्या काळाचे सार्थ वर्णन आहे. संभाजी महाराजांच्या बलीदानामुळे मराठ्यांचा स्वाभिमान पुन्हा जागा झाला, ही तीनशे वर्षांपूर्वीच्या राष्ट्रजीवनातील अतिशय महत्त्वाची बाब ठरली. यामुळे इतिहासाला कलाटणी मिळाली. जनतेच्या पाठिंब्यामुळे मराठ्यांचे सैन्य वाढत गेले आणि सैन्याची संख्या दोन लाखांपर्यंत पोहोचली. जागोजागी मोगलांना प्रखर विरोध सुरू झाला आणि अखेर महाराष्ट्रातच २७ वर्षांच्या निष्फळ युद्धानंतर औरंगजेबाचा अंत झाला आणि मोगलांच्या सत्तेला उतरती कळा लागून हिंदूंच्या शक्‍तीशाली साम्राज्याचा उदय झाला.
२७ वर्षे औरंगजेबाच्या पाशवी आक्रमणाविरुद्ध मराठ्यांनी केलेल्या संघर्षात हंबीरराव, संताजी, धनाजी असे अनेक युद्धनेते होते; परंतु या लढ्याला कलाटणी मिळाली ती संभाजीराजांच्या बलीदानातून झालेल्या जागृतीमुळेच।

शंभूतीर्थ साकार व्हावे, ही श्रींची इच्छा !
श्रीक्षेत्र वढू, ता. शिरूर, जि. पुणे या ठिकाणी हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती शिवपुत्र संभाजीराजे यांची समाधी आहे. या ठिकाणी राजांच्या जीवनचरित्राला शोभणारे भव्य स्मारक निर्माण करण्याचे कार्य आता वेगात सुरू आहे. भुईकोट किल्ल्याच्या स्वरूपातील या स्मारकामध्ये शंभूछत्रपतीच्या तेजस्वी जीवन चरित्रावरील शिल्पप्रदर्शनी, ऐतिहासिक वस्तूंचे व ग्रंथांचे संग्रहालय इत्यादी वास्तूंचा समावेश आहे. स्मारकाचे काम पूर्ण झाल्यानंतर या वीरभूमीवर मराठी युवकांसाठी लष्करी विद्येचे शिक्षण केंद्र (कमांडो ट्रेनिंग) सुरू करण्याचा धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समितीचा संकल्प आहे.
हे सर्व काम केवळ लोकवर्गणीतून चालू असून साधू-संतांचे आशीर्वाद आणि इतिहासकारांचे मार्गदर्शन या कार्याला लाभले आहे. त्यामुळे हे कार्य पूर्णपणे यशस्वी होणारच याची खात्री आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात रायगडानंतर श्रीक्षेत्र वढूचे महात्म्य मानले जाते. श्री शिवरायांच्या अकाली मृत्यूनंतर नऊ वर्षे संभाजीराजांनी औरंगजेबाच्या टोळधाडीपासून हिंदवी स्वराज्याचे संरक्षण आणि संवर्धन केले. फितुरीमुळे शत्रूच्या तावडीत सापडलेल्या राजांनी मृत्यू स्वीकारला; परंतु स्वधर्म आणि स्वाभिमान सोडला नाही ! त्यांच्या बलीदानामुळे मराठे पेटले आणि मोगल हटले ! हा महाराष्ट्राच्या विजयाचा ज्वलंत इतिहास आहे. हा प्रेरणादायी इतिहास साकार होणार आहे `शंभूतीर्थ' या शंभूछत्रपतींच्या स्मारकाच्या रूपाने !

शिवाजी आणि संभाजी हे आहेत महाराष्ट्र धर्माचे मूलमंत्र ।
जगावे कसे सांगे शिवचरित्र आणि मृत्यूचा आदर्श देई शंभूचरित्र ।।

संभाजीराजांचे प्रत्येक हिंदु बांधवावर उपकार आहेत.त्यांनीच संपूर्ण भारतवर्षातील हिंदु धर्माचे रक्षण आपल्या कारकीर्दीत तसेच आपल्या मृत्यूनंतरसुद्धा केले, हे निर्विवाद सत्य आहे. म्हणूनच श्री गगनगिरी महाराज म्हणतात, ``श्रीक्षेत्र वढू (संभाजीराजांचे समाधीस्थान) जगातील सर्व हिंदु धर्मियांची पुण्यभूमी आहे !'' आज रविवार, १८ मार्च रोजी पूजनीय आचार्य धर्मेंद्रजी आणि युवकमित्र बंडातात्या कराडकर यांच्या उपस्थितीत साजर्‍या होणार्‍या संभाजीराजांच्या ३१८ व्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमात प्रत्येक हिंदु धर्माभिमानी व्यक्‍तीने सहभागी होणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी ही नम्र विनंती !

लेखक : श्री. मिलिंद रमाकांत एकबोटे, कार्याध्यक्ष, धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समिती, महाराष्ट्र.

जगात देहधारी देव नाही पण देवत्व आहे

आपल्याला काळात जरी नसले तरी जगात आपल्या आकालनापलिकडे काही तरी आहे एव्हडे आपल्याला नक्कीच कलते. काही तरी आहे पण दाखवता येत नाही, एकु येत नाही, स्पर्श करता येत नाही, वास घेता येत नाही,
आणि चव ही घेता येत नाही. या सर्व पलिकडचे काही तरी मात्र नक्की काही तरी आहे.
एक दोन रुपये टाकले , नवस केले किवा त्याची स्तुति केली की तो आपणास पावतो अशी आपली समज असते. तर करता करवितो तोच आपण मात्र निमितमात्र असे म्हणायचे आणि एखादी गोस्ट कशी साध्य केली हे रंगून सांगनारे ही आपणच. प्रभु तुज्या अंतर्यामी आहे असे सांगत तीर्थक्षेत्राच्या वार्या करणारे ही आपणच. सर्वत्र परमेश्वर विराजमान आहे असा धान्डोरा पिटवत उपवासाच्या नावाखाली काही अन्नाला त्याज्ज ठरवनारे महाभाग ही आपणच...
श्रीमंत माणसाच्या बागेत त्याला न विचारता जाउन फले, फुले तोडून त्यालाच अर्पण करायची आणि वर म्हणायचे प्रसन्न हो ... आशीर्वाद दे ... तर तो प्रसन्न होऊंन आशीर्वाद देईल का ? हे स्वतालाच विचारावे...
वेलीवर इतकी छान सुन्दर दिसणारी फुले तोडून हे काय मिलवतात? आणि कुठल्या देवाला कुठली फुले आवडतात ते देखिल हेच ठरवतात...
मला वाटते इथे आपले असे काय आहे की ते आपण देवाला देऊ शकतो हा विचार प्रतेकाने करावा असे वाटते .
देवाशी आपला व्यवहार म्हणजे अंगावर येणार्या कुत्र्याला लांब ठेवण्यासाठी घाबरून भाकरीचा टुकडा टा कन्या सारखे व्रत, पूजापाठ, उपासतापास हे सारे काही केवल एकाच भावनेतुन चाललेले असते... माज्यावर कृपा कर ... कोपु नकोस ...
जगात देहधारी देव नाही पण देवत्व आहे इतकी आनद दायक गोष्ट कुणालाच नको आहे का ??
- राज शिंदे

वपुर्झा - व. पु. काळे


आमचा देव दगडाचा नाही. आम्ही दगडात देव पाहणारी माणसं आहोत. दगडात देव असतोच, मुर्ती असतेच.दगडाचा फ़क्त नको असलेला भाग काढुन टाकायचा असतो.मुर्तीच्या भागाकडे फ़क्त लक्ष ठेवा. फ़ेकुन द्यायच्या भागाकडे नको. आणी मग ह्याच भावनेनं, निसर्गातल्या इतर गोष्टींकडे पहा. झाडं, नद्या, वारे, आकाश, जमीन आणी शेवटी माणुस. माणसातलाही नको असलेला भाग दूर करायला शिका. ह्याची सुरुवात स्व:तपासुन करा. स्व:तला नको असलेला भाग कोणता? तर ज्यापायी आपला आनंद, प्रगती, निष्टा आणी आत्मविश्वास ह्याला तडा जातो तो आचार, तो विचार हा टाकायचा भाग..

'स्त्री’ ला जन्माला घालताना परमेश्वराने तिला विचारलं, 'तुला बुद्धी हवी का सौंदर्य?’ तेंव्हा ती स्त्री म्हणाली, 'बुद्धीची गरज नाही, सौंदर्यच दे! 'का?' 'बुद्धीच्या सामर्थ्यावर सौंदर्य मिळवता येत नाही, पण सौंदर्याच्या जोरावर बुद्धी विकत घेता येते.’

"आपत्ती पण अशी यावी कि तिचा इतरांना हेवा वाटावा....व्यक्तिचा कस लागावा.पडायचंच असेल तर, ठेच लागुन पडू नये, चांगलं २००० फ़ुटांवरुन पडावं..म्हणजे माणूस किती उंचावर पोचला होता हे तरी जगाला समजेल. !"

पशू माणसांपेक्षा जास्त श्रेष्ठ आहेत कारण ते INSTINCT वर जगतात...बेदम वजन वाढलंय म्हणून घारीला उडता येत नाही, किंवा एखादा मासा बुडाला असं कधी ऐकलंय का ?

एकदा केव्हातरी शांतपणे बसावं आणि वयानुसार आपण काय काय गोष्टी सोडल्या ह्याचा आढावा घ्याचा. मग लक्षात येतं, की आपण गाभुळलेली चिंच बरयाच वर्षात खाल्ली नाही, जत्रेत मिळणारी पत्र्याची शिट्टी वाजवलेली नाही. चटक्याच्या बिया घासुन चटके द्यावेत असं आता वाटत नाही, कारण परीस्थितीचे चटके सोसतानाच पुरेवाट झालेली असते. कॅलिडोस्कोप बघितलेला नाही. सर्कशितला जोकर आता आपलं मन रिझवु शकत नाही. तसंच कापसाची म्हातारी पकडण्याचा चार्मही आता राहीलेला नाही. कापसाच्या त्या म्हातारीने उडता उडता आपला "बाळपणीचा काळ सुखाचा " स्वत: बरोबर कधी नेला ते कळलंच नाही. त्या ऊडणारया म्हातारीने सर्व आनंद नेले. त्याच्या बदल्यात तिच वार्धक्य तिने आपल्याला दिलं. म्हणुन ती अजुनही ऊडु शकते. आपण जमिनीवरच आहोत


जाळायला काही नसलं की पेटलेली काडीसुद्धा आपोआप विझते.

खर्च झाल्याचं दु:ख नसतं, हिशोब लागला नाही की त्रास होतो.

प्रॉब्लेम्स नसतात कोणाला? ते शेवटपर्यंत असतात. पण प्रत्येक प्रॉब्लेमला उत्तर हे असतचं. ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा तर कधी माणसं या तिन्ही गोष्टीपलिकडचा प्रॉब्लेम अस्तित्वात नसतो.

एकाकीपण वेगळं , एकांत वेगळा . परीसराचं मौन म्हणजे एकांत .आणि परिवारात असतानाही पोरकं वाटण हे एकाकीपण .एकाकी वाटलं तर मनसोक्त रडावं.

अश्रु म्हणजे दुबळेपणा नाही. पावसाळी ढग जसे बरसल्यावर हलके होतात. आणि दिसेनासे होतात, तसा माणुसही हलका होतो. आकाशाजवळ पोहोचतो. असंच कोणतं तरी दुःख पार केल्यावर तुकाराम " तुका आकाशायेवढा " असं लिहुन गेला असेल.

आकाशात जेव्हा ऊपग्रह सोडतात तेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर पिटाळुन लावे पर्यंत संघर्ष असतो, त्याने गती घेतली की उरलेला प्रवास आपोआपच होतो . असच माणसाचं आहे.......समाजात एक विशिष्ट ऊंची गाठे प्रर्यंत सगळा संघर्ष असतो. पण एकदा अपेक्षित ऊंचीवर पोहोचलात की आयुष्यातल्या अनेक समस्या ती ऊंचीच सोड्वते.

सर्वात जिवघेणा क्षण कोणता? खूप सद्भावनेनं एखादी गोष्ट करायला जावं आणि स्वतःचा काहीही अपराध नसताना पदरी फक्त वाईटपणा यावा, सद-हेतूंचीच शंका घेतली जावी, हा!

पावसातून भटकताना अंगावरचा शर्ट भिजतो , तेंव्हा काही वाटत नाही. तो अंगावरच हळू हळू सुकतो त्याचंही काही वाटत नाही.सुकला नाही तरी ओल्याची सवय होते.पण म्हणून कोणी ओलाच शर्ट घाल म्हटले तर.....

प्रश्नांपासून नेहमीच पळता येत नाही,कधी ना कधी ते पळणार्‍याला गाठतातच,पळवाटा मुक्कामाला पोहचवत नाहीत, मुक्कामाला पोहचवतात ते सरळ रस्तेच...

निर्णय चुकीचा आहे की बरोबर हे काळावर मोजायचं की बुध्दीवर ?बुध्दीच नसेल तर ३ तास दिले तरी पेपर कसा सोडवणार ?

बुधवार, २१ ऑक्टोबर, २००९

पार्टनर - व. पु. काळे


पोरगी म्हणजे झुळुक! अंगावरून जाते. अमाप सुख देऊन जाते. पण धरून ठेवता येत नाही.

आपल्याला हवा तेव्हा तिसरा माणुस न जाणं हाच नरक.

तुला मी हाक कशी मारु? पार्टनर ह्याच नावाने.
आपल्याला खरं तर नावच नसतं. बारशाला नाव ठेवतात ते देहाचं.

लक्षात ठेव दोस्त, तुला मी हवा आहे म्हणुन मला तू हवा आहेस.

कुणाचा तरी मुलगा होणं टाळता येत नाही. कुणाचा तरी बाप होणं टाळता येतं.

दु:खं, आनंद, जय, पराजय, हसु, आसु, जन्म, मरण, विरह-मिलन, सगळं तसच असतं .प्रत्येक क्षणी माणसाचं मन नवा जन्म घेतं, एवढच काय ते नविन. पुन्हा जन्म घेण्याची ही क्रिया थांबणं हेच मरण.

समुद्राची ताकद टिटवीला समजत नाही.
आकाशाची व्याप्ती गरुडाला समजत नाही.
सुगंधाचं कोडं फ़ुलाला उमलत नाही.
एवढासा तू, त्याहुन एवढासा मी मला जिवनाचा अर्थ कसला विचारतोस?आणी त्याहीपेक्षा संभोगाचा अर्थ लावायचा असतो, हे तुला कोणी सांगितले?
पाणी म्हणजे एच टू ओ.इथचं सगळे थांबलेले आहेत.मुर्ख म्हणुन नव्हे तर जाणकार म्हणुन थांबले.
पृथ:करण पाण्याचं करायचं असतं, तहानेचं नाही हे त्यांना समजलं म्हणुन.
कोणता आनंद क्षणजीवी नाही?
दोन इंच लांबीच्या जिभेवर पदार्थ असतो तोवर चव. खाली उतरला की घास.
सुगंधाचं नातं नाकाशी.घशातुन आत गेल्यावर ति फ़क्त हवा.
खरं तर सगळ्या पंचेंद्रियांचं नातं रसिकतेशी नसुन तृप्तीशी असतं. तो क्षण संपला की रसीकता संपली.
इतर अनेक गरजांप्रमाणे "तृप्ती" जी एक गरज आहे.
जो गरजु आहे त्याला व्यवहार सांभाळावा लागतो.व्यवहार नेहमी साधतोच असं नाही.तो सत्यासारखा कटू असतो.
ज्या मनात रसिकता असते त्याच मनात कटूता निर्माण होते.
सध्या एकच वर्तमान्काळ सांभाळ.

वपुर्वाई - व. पु. काळे


प्रेम निर्माण व्हायला सहवासाची मदत लागते. जितका सहवास जास्त तितके प्रेम जास्त. आकर्षणाला एक सेकंदाचा सहवास पुरतो. म्हणुनच आकर्षणाला अस्तित्व काही सेकंदापुरतचं असतं.


फ़ायदा नेहमी गरीब स्वभावाचा घेतला जातो.तुम्ही भिडस्त आहात ना हेच समोरचा माणुस हेरत असतो. बोडक्यावर बसुन तुम्ही पै न पै वसुल करणार्‍यांपैकी नव्हेत, याची खात्री पटल्यावरच तुमच्याशी व्यवहार केला जातो.अशा माणसांकडे तुमच्यापेक्षा मोठ्यांदा गळा काढण्याचं सामर्थ्य आणी तुमच्यापेक्ष्या मोठ्या अडचणींची यादी असते.


परिस्थिती बदलणारे आपण कोण? गृहीत धरायची शक्ति एवढ्यासाठीच वाढवायची, त्यामुळे 'मन' नावाची एक दुर्मिळ वस्तू सुरक्षित राहते. टवटवीत राहते. मन कोसळलं की माणूस कोसळला मन शाबूत ठेवलं की आयुष्य पैलथडीला हसतखेळत नेता येतं. माणूस प्रथम मनान खचतो. तसं झाल की प्रवाह संथ असतानाही त्यांच्या होड्या उलटतात. आपण फक्त एवढच करू शकतो की आपण आपला शब्द फिरवल्यामुळे दुसर्‍याची होडी बुडणार नाही ना एवढीच काळजी घ्यायची, म्हणजे घेऊ शकतो.


शरीर ही दिसणारी गोष्ट आहे. दोन व्यक्तीना एकमेकांबद्दल विचार करायला लावणारं आणि म्हणूनच जवळ असणारं ते माध्यम आहे. शरीर गौन मानण्यात काहीच अर्थ नाही. संसाराचा प्रवासच ह्या स्टेशनावरून सुरू होतो. तेव्हा हे पहीलं स्टेशन चुकवता येत नाही. तिथ रेंगाळू नये वा तिथंच मुक्काम करू नये. पण चुकवता कसं येईल? सौंदर्याचा वेध नेहमीच दृश्यापासून अदृश्याकडे जाणारा असतो. प्रत्येक जण आपापल्या कुवतीनुसार अधलं मधलं स्टेशन निवडतो. सगळेच संसार बघून सावरूनही सुखाचे होत नाहीत ह्याच कारण ते आहे पहीलं स्टेशनच ते सोडायला तयार नसतात. रंगमंचावरचा संसार आणि प्रत्यक्षातला संसार ह्यात हाच फरक आहे. रंगमंचावरचा संसार आणि प्रवास फक्त शरीराचा संसार. तिथ सौंदर्य आणि शरीर संपला की प्रवास संपला.


माझी संसाराची व्याख्याच निराळी आहे.एकमेकांचे वाभाडे काढण्यासाठी किंवा वर्मावर चोची मारण्यासाठी संसार करायचा नसतो.जिथं जोडीदार कमी पडेल तिथं आपण उभं राहायच.
मी तुला स्वीकारलं ते तुझ्या वलायासहित स्वीकारलं. माणसाच्या स्वभावतली एखादी छटा म्हणजे तो संपूर्ण माणूस नाही. एखाद्या क्षणी एखादी भावना अनावर होते. का? ह्याचं कारण ज्याचं त्याच्याजवळ नसतं.भावनांचे तिढे आपण बुद्धीने सोडवायला बघतो आणि बुद्धिवादानं कठोर प्रश्न सोडवायचे असतात. तिथं आपण भावनेचा घोळ घालतो ही सगळी झापडच.


'निर्णय चुकीचा आहे की योग्य आहे हे काळा वर मोजायच की बुद्धीवर? तुम्हाला बुद्धीच नसेल तर पेपर सोडवायला संपूर्ण तीन तास नव्हे, अख्खा दिवस दिला तरी काय उपयोग? आपण सगळ्या गोष्टी वापरायला शिकतो, फक्त वेळ वापरायला शिकत नाही. किल्लीच घड्याळ गेल Electronic च आल. वेगवेगळी घड्याळ वापरायची की संपल..'

शुक्रवार, ९ ऑक्टोबर, २००९

याला जीवन ऐसे नाव ...

काही दिवसांपूर्वी मी सरश्री तेजपारखी यांचे एक खुप सुन्दर पुस्तक वाचले ..स्विकाराची जादू .. त्याचे थोडक्यात विवेचन मी इथे देत आहे आयुष्यात कुटुंब, कामाचं ठिकाण, नातेवाईक, समाज अशा अनेक ठिकाणी संकटं येतात। संकटं टाळता येणं शक्य नाही, पण... दु:ख टाळता येणं शक्य आहे। एखाद्या घटनेकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलता येते आणि तीच ताकद विचारांमध्ये असते।कारण कोणत्याही कृतीच्या मुळाशी एक माणूस म्हणून यशस्वी जीवन जगू पाहणाऱ्या प्रत्येकाने हे वाचायला हवं... नव्हे, अगदी १००% आचरणात आणायला हवं ! ...वाचून आपल्या प्रतिक्रिया जरुर दया ....
कुठलीही घटना सुख वा दुःख तयार करत नाही तर त्या घटनेमुले आपल्या मनामधे जे विचार सुरु होतात त्या विचारामुले आपण सुखी व दुखी होत असतो। समजा आपल्या पाकिट हरवले तर ते हरवलेले पाकिट नव्हे तर पाकिट हरावल्याच्या विचारने दुःख होते. म्हणजेच ती घटना नाही तर त्या बाबत मनात आलेले विचार दुखास कार्नीभुत असतात. म्हणजेच जर तुम्ही दुखी होऊ इछित नसाल तर जगातील कुठलीही घटना तुम्हाला दुखी करू शकणार नाही.बर्याचदा जीवनात अनेक वाईट प्रसंग येतात तेव्हा हे ही बदलून जाईल असे म्हणुन पुढे जावे. एखाद्या प्रिय व्यक्तीचे निधन होते तर तेव्हा शेवटी कुठेतरी थाम्बावे लागतेच. असे म्हणुन पुढे वाटचाल करावी आणि कुठल्या गोष्टीला किती कीमत द्यावी तर समजा एखाद्या दुकानात एक रुपयाची काडीपेटी पाच रुपयाला मिळत असेल तर ती कीमत देऊन आपण घेऊ का? नाही ना ॥ कारण त्याची जितकी किम्मत आहे तितकीच तुम्ही देऊ इच्छिता त्याचप्रमाणे आपल्या जीवनात काही अप्रिय घटना घडून गेल्या आहेत किवा घडत आहेत. त्याना किती कीमत दिली पाहिजे आणि आपण किती कीमत देत आहोत हे पडतालूंन पाहिले पाहिजे आपण स्वताला व्यावहारिक समजतो आणि मग अविचाराने व्यवहार करतो. एखाद्या घटनेचे दुःख किती काल करायचे ? हे स्वताच समजुन घेतले पाहिजे.आणि आपल्या दुखाला आपणच जबाबदार असतो. जेव्हा आपण आपल्या दुखाचीजबाबदारी स्वीकारतो तेव्हा आपण इतरांविषयी तक्रार करणे बंद करतो.जेव्हा आपण स्वताला दुखी होऊ देऊ शकतो तेव्हा आपण स्वताला आनंदी ही होऊ देऊ शकतो.समजा आपल्याला कुणी वाईट शब्द वापरले तर आपणास दुःख होते आणि एखाद्याने आपले कौतुक केले तर मात्र आपणास खुप आनंद होतो म्हणजेच याचा अर्थ आपला रिमोट समोरील व्यक्तीच्या हातात आहे तो जसे बटन दाबेल त्याप्रमाणे आपणास सुख वा दुखाची प्राप्ति होत असते. तेव्हा आपले रिमोट समोरील व्यक्तीच्या हातात देने हीच आपली चुक आहे. आपले रिमोट आपल्याच हाती असू दया आणि बाहेरच्या घटनानी विचलित न होता सदैव आनंदी रहायला शिका .थोड्या प्रयत्नानी हे सहज शक्य होते. लहान मूल जेव्हा चालायला शिकते त्यावेळी ते चालते कमी आणि पड़ते जास्त आणि मग तरीही ते चालायला शिकते की पडायला.... तर चालायलाचना.. का तर ते अपयशाने खचून जात नाही किवा विचलित होत नाही म्हणुन ...
माणुस नेहमी भुत किवा भविष्यात जगत असतो। समजा उदया रविवार आहे तर आज आपल्याला खुप बरे वाटते अर्थात इन्सान कल का इस्तेमाल करे कल उसका इस्तेमाल न करे ... इन्सान यदि वर्तमान में नहीं रह पाता तो इसका मतलब है की कल उसका इस्तेमाल कर रहा है ॥मानसाजवल असणारे सुखच त्याच्या दुःखाचे कारन असते। त्याच्या जवळ पद, प्रतिष्ठा, पैसा, परिवार, मित्रांचे प्रेम या सर्व गोष्टी असतील तर तो सुखी असतो या सर्व गोष्टी नसतील तर तो काय सुखी राहू शकेल॥ यातील एक जरी गोष्ट नष्ट जाली तरी तो दुखी होतो म्हणजेच ...अप्रत्यक्षपने हे सुखच त्याच्या दुःखाचे कारन आहे।कुठलीही घटना चांगली किवा वाईट नसते. हर एक अपनी जगह पर सही होता है॥ आपण त्याकडे ज्या दृष्टिकोनातून बघतो तो दृष्टिकोण त्या घटनेला चांगले किवा वाईट स्वरुप प्राप्त करून देत असते. तेव्हा ती घटना किवा दुःख स्वीकार करायला शिका. स्वीकार करना मतलब मुश्किलोसे भागना नहीं बल्कि उसे सुलजाने का पहला कदम है.. समजा तुम्हाला ऑफिसला जायला उशीर जालेला आहे आणि बाहेर येउन बघतो तर तुमच्या कारला चिटकुन कुणी तरी आपली कार लावली आहे या गोष्टीला जर तुम्ही स्वीकार केले तर तुम्ही शांतपणे विचार कराल की त्याची देखिल काहीतरी मज़बूरी असेल तेव्हा तुम्ही शांतपणे त्याला कार काढायला सांगू शकालआणि तो ही आपली गाड़ी बाजूला घेउन तुम्हाला मार्ग करून देईल. नाही तर तुम्ही रागात त्याच्याशी भांडत बसला असता. स्वीकार करने की भावना की साथ इन्सान के दोनों हाथ खुल जाते है और वो खुले हाथोसे समस्यावोको सुलज़ा पाता है...तुम्हे कोई दर्द महेसुस हुआ और तुमने उसे स्वीकार किया तो तुम देखोगे अब दर्द वैसा नहींलगता जैसे पहेले लगता था... स्वीकार के साथ ही दर्द और दर्दका दुःख कम हो जाता है..अर्थात दर्द हो मगर दर्द का दुःख ना हो , सुख हो मगर सुख जाने का दुःख ना हो ....
- राज शिंदे