सोमवार, ८ नोव्हेंबर, २०१०

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा भारत दौरा ....




अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा भारत दौरा ....
मी हाय कोली, सोडिल्या डोली, मुंबईच्या किनारी... या पारंपारिक कोळीनृत्यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांच्या पत्नी लेडी मिशेल यांनाही विद्यार्थ्यांना नाचायला लावले . डान्स फ्लोअरवर कोळी ' ओबामा ' पारू ' मिशेल ओबामा हे दाम्पत्य कोळीनृत्यावर नाचत असल्याचे हे नयनरम्य चित्र रंगले ते कुलाब्याच्या होली नेम हायस्कूलमध्ये.

मुंबई दौ-यावर असलेल्या ओबामा यांनी आज सकाळी सपत्नीक होली नेम शाळेला भेट देऊन शाळकरी विद्यार्थ्यांसोबत दिवाळी साजरी केली.
हाय, हॅलो आणि नमस्ते म्हणत त्यांनी या विद्यार्थ्यांना हस्तांदोलन केले। तसेच प्रत्येकाला भेटल्यानंतर so nice to see u असेही आर्वजून सांगितले।

ओबामानी घेतला विद्यार्थ्यांचा क्लास
सेंट झेव्हियर्स कॉलेजच्या प्रांगणात आज सुमारे एक तास संवाद साधला तो अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि मिशेल ओबामा यांनी। विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना बराक ओबामा यांनी मनमोकळेपणाने उत्तरे दिली. पाकिस्तानशी असलेल्या संबंधांपासून ते अफगाण पॉलिसीपर्यंत आणि महात्मा गांधींच्या शिकवणीपासून ते अमेरिकेच्या प्रगतीपर्यंत विविध प्रश्न विद्यार्थ्यांनी त्यांना विचारले. जगातील सर्वात शक्तिमान राष्ट्रप्रमुख विद्यार्थ्यांमध्ये मनमोकळेपणाने मिसळत असल्याचे दृश्य निराळेच होते।

ओबामांची राष्ट्रपिता महात्मा गांधींना आदरांजली

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा व त्यांची पत्नी मिशेल ओबामा यांनी मुंबई येथील मणीभवन या वास्तूस भेट देऊन गांधीजींना आदरांजली अर्पण केली.

यावेळी मणीभवन येथील `व्हिजिटर्स बुक` मध्ये उभयंतांनी संदेश लिहिला तसेच मणीभवनच्या व्यवस्थापकांसोबत संवादही साधला।

`स्लेव्हरी` हे पुस्तक माझ्यासाठी अमूल्य भेट - बराक ओबामा
उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना शनिवारी हॉटेल ताजमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी १८७३ मध्ये लिहिलेले स्लेव्हरी (गुलामगिरी) हे पुस्तक भेट दिले। त्यावेळी बराक ओबामा यांनी `ही आपल्यासाठी अमूल्य भेट असल्याचे` उद्गार काढले।

ओबामांनी जिंकले संसदेचे मन

भारताला भेट देणाऱ्या सहा अध्यक्षांपैकी संसदेत भाषण करणारे ओबामा हे अमेरिकेचे पाचवे अध्यक्ष ठरले आहेत। त्यांच्या 38 मिनिटांच्या भाषणात अनेकदा टाळ्यांचा कडकडाट झाला. ओबामा म्हणाले, ""महात्मा गांधीजींचं तत्त्वज्ञान अमेरिकेत पोचलं नसतं, तर मी तुमच्यासमोर उभा राहून भाषण करू शकलो नसतो,'' असं उद्‌गारले तेव्हा सेंट्रल हॉलमध्ये झालेला टाळ्यांचा कडकडाट अपूर्व होता.
"जय हिंद' असा भाषणाचा समारोप करून ओबामा परत निघाले, तेव्हा हस्तांदोलनासाठी धडपडणाऱ्यांसह प्रत्येक खासदाराच्या चेहऱ्यावर "अजि मी ओबामांना पाहिले' असे स्पष्ट भाव उमटले...स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी, गुरूदेव रवीद्रनाथ टागोर, डॉ। बाबासाहेब आंबेडकर ते पंचतंत्र यातले सूचक दाखले देत जगातल्या एकमेव महासत्तेचे प्रमुख, अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेवर स्थायी सदस्यत्व मिळावे यासाठी पाठिंबा देण्याची ऐतिहासिक घोषणा आज केली. अफगाणिस्तानला पाक पुरस्कृत अल कायदाच्या स्वाधीन करून अमेरिका काढता पाय घेईल ही भारताला वाटणारी भीतीही त्यांनी अनाठायी ठरविली. अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानच्या जबाबदारीतून मुक्त व्हायला पुढच्या वर्षी सुरुवात करेल मात्र आम्हा सर्वांसाठीच धोका असलेल्या अतिरेक्यांच्या हाती आम्ही अफगाणिस्तानला पडू देणार नाही वा त्यांना वाऱ्यावरही सोडून देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. इराणने अण्वस्त्र विकासाचा कार्यक्रम सोडून द्यावा यासाठी भारताने आपले वजन वापरावे आणि म्यानमारमधील चीनच्या प्रभावाखाली असलेली हुकूमशाही आणि मानवी हक्कांची पायमल्ली रोखण्यासाठीही भारताने आवाज उठवावा, असे स्पष्टपणे सांगत आशियाई खंडातील भारताच्या भूमिकेबद्दलच्या अमेरिकेच्या अपेक्षाही त्यांनी उघड केल्या.

gs >kys R;kaP;k Hkkjr HksVhfo"k;h --- vkrk vki।k R;kaP;k fo"k;hp tk.kwu ?ks.kkj vkgksr ---

बराक हुसेन ओबामा (जन्म: ऑगस्ट ४, १९६१) हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. अमेरिकेचे ४४ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांनी जानेवारी २०, २००९ रोजी पदग्रहण केले. डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार असलेल्या ओबामांनी नोव्हेंबर ४, २००८ रोजी झालेल्या अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार सेनेटर जॉन मॅककेन ह्यांचा ३६५ विरुद्ध १६५ मतांनी पराभव केला. ओबामा हे अमेरिकेचे पहिले आफ्रिकन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आहेत. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी ते इलिनॉय ह्या राज्यामधून अमेरिकेचे सेनेटर होते. अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदासाठी त्यांनी सेनेटर जोसेफ बायडेन ह्यांची निवड केली आहे. ओबामा हे अमेरिकेच्या शिकागो ह्या शहराचे निवासी आहेत.

९ ऑक्टोबर २००९ रोजी त्यांनी जागतिक शांततावाढीसाठी व अण्वस्त्र प्रसार रोखण्यासाठी केलेल्या योगदानासाठी ओबामांना २००९ सालचे नोबेल शांतता पारितोषिक देण्यात आले।
जन्म, लहानपण व शिक्षण

बराक ओबामांचा जन्म अमेरिकेच्या हवाई राज्यातील होनोलुलु ह्या शहरात झाला. त्यांचे वडील बराक ओबामा सिनियर हे केन्या ह्या देशाचे नागरीक होते आणि त्यांची आई ऍन डनहम ही अमेरिकेच्या कॅन्सस ह्या राज्यातली होती. ओबामांचे प्राथमिक शिक्षण इंडोनेशिया ह्या देशातील जकार्तामध्ये झाले. ते १० वर्षाचे असताना हवाईला परतले आणि त्यानंतर त्यांच्या आजी-आजोबांनी त्यांना वाढवले. हवाईतून माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी कोलंबिया विद्यापीठातून राजकारणशास्त्र ह्या विषयातून १९८३ मध्ये पदवी घेतली आणि हार्वर्ड विद्यापीठाच्या कायदा विभागातून १९९१ मध्ये उच्च पदवी घेतली. हार्वर्डमध्ये असताना ते हार्वर्ड लॉ रिव्ह्यू चे पहिले कृष्णवर्णीय अध्यक्ष होते. त्यानंतर पुढची १२ वर्षे त्यांनी शिकागो विद्यापीठामध्ये संविधानशास्त्र शिकवले.

कौटुंबिक व खाजगी आयुष्य
बराक ओबामांची मिशेल रॉबिन्सन ह्यांच्याशी १९८९ मध्ये शिकागोत भेट झाली व त्यांनी १९९२ साली लग्न केले. ओबामा दांपत्याला मलिया (वय: १० वर्षे) आणि नताशा (वय: ७ वर्षे) ह्या दोन मुली आहेत. आजी मॅडेलाईन डनहम ह्यांना ओबामा कायम आपल्या कुटुंबाचा मोठा आधारस्तंभ असे संबोधतात. अध्यक्षीय निवडणुकीच्या फक्त २ दिवसांआधी मॅडेलाईन डनहमांचे हवाईमध्ये वयाच्या ८५व्या वर्षी निधन झाले.

बराक ओबामांनी आत्तापर्यंत २ पुस्तके लिहिली आहेत. त्यांचे ड्रीम्स फ्रॉम माय फादर (Dreams from My Father) हे आत्मचरित्र १९९५ मध्ये तर द ऑडासिटी ऑफ होप (The Audacity of Hope) हे पुस्तक २००६ मध्ये प्रकाशित झाले आहे. आपल्या दुसर्‍या पुस्तकात त्यांनी आपले राजकीय विचार सविस्तर मांडले आहेत.

बास्केटबॉल हा ओबामांचा आवडता खेळ आहे. निवडणुकीच्या धामधूमीत विरंगुळ्यासाठी ते बर्‍याचवेळ बास्केटबॉलचा आधार घेत असत. अध्यक्षीय निवडणुकीला उभे राहण्यापूर्वी ओबामांनी आपण धुम्रपान सोडत असल्याचे जाहीर केले. २००८ साली एका मुलाखतीमध्ये त्यांनी तरुणपणी मद्यसेवन व अंमली पदार्थांचे सेवन केले असल्याची कबुली दिली.

बराक ओबामा हे धर्माने ख्रिश्चन आहेत. "आपले वडील त्यांच्या लहानपणी मुस्लिम होते पण तरुणपणापासुन ते नास्तिक बनले, तर आपली आई धार्मिक नव्हती", असे ओबामा आपल्या द ऑड्यासिटी ऑफ होप ह्या पुस्तकात लिहितात. ओबामांनी इंडोनेशियात शिकताना गुप्तपणे मुस्लिम धर्मांतर केले होते किंवा ते एका मदरश्यामध्ये शिकत होते अशा स्वरूपाच्या अफवा निवडणुकीच्या काळात उठवल्या गेल्या होत्या, पण त्या खोट्या आहेत असे निष्पन्न झाले.ओबामा शिकागोच्या ट्रिनीटी युनायटेड चर्च ऑफ क्राइस्ट (Trinity United Church of Christ) चे सभासद होते, पण त्या चर्चचे पाद्री जेरेमाइयाह राईट हे प्रार्थनांदरम्यान वारंवार वर्णद्वेषी व अमेरिकाविरोधी वक्तव्ये करीत असल्याची बातमी डेमोक्रॅटिक पक्षाच्या प्राथमिक निवडणुकांदरम्यान बाहेर आल्यानंतर ओबामांनी पाद्री राईटशी (आणि पर्यायाने ट्रिनीटी चर्चशी) असलेले संबंध तोडून टाकले.

जागतिक लोकप्रियता
बराक ओबामांच्या श्रोत्यांना मंत्रमुग्ध करुन टाकणार्‍या भाषणशैलीमुळे त्यांची तुलना मार्टिन ल्युथर किंग, जुनियर बरोबर केली जाते. केन्यन वडील, अमेरिकन आई, हवाईमधील जन्म, इंडोनेशियातील शिक्षण आणि आयव्ही लीग विद्यापीठांमधून उच्चशिक्षण ह्या सर्व गोष्टींमुळे ओबामांच्या व्यक्तिमत्त्वाला एक वेगळीच झालर मिळाली आहे ज्यामुळे ऐतिहासिक कृष्णवर्णीय अमेरिकन राजकारण्यांच्या तुलनेत त्यांचे वेगळेपण उठून दिसते. ओबामांच्या २० जानेवारी २००९ रोजी झालेल्या वॉशिंग्टनमधील राष्ट्राध्यक्षपदाच्या शपथविधी सोहळ्याला लाखो चाहत्यांनी थंडीची पर्वा न करता हजेरी लावली.

ओबामांची लोकप्रियता केवळ अमेरिका देशापुरतीच सीमित नाही. २००८ साली बीबीसीतर्फे घेण्यात आलेल्या एका कौलामध्ये २२ देशांच्या लोकांनी (भारतासह) ओबामांना पसंती दाखवली आणि १७ देशांच्या लोकांनी ओबामा निवडून आल्यानंतर अमेरिकेचे जगातील इतर देशांशी संबंध सुधारतील असे भाकित केले होते.निवडणुकीमध्ये ओबामा विजयी झाल्याचे जाहीर झाल्यानंतर जगभरात त्यांच्या चाहत्यांनी जल्लोष व्यक्त केला. ओबामांचा विजय केन्यामध्ये प्रचंड धुमधडाक्यात साजरा केला गेला. केन्याच्या राष्ट्राध्यक्षांनी ह्या आनंदाप्रीत्यर्थ एका दिवसाची राष्ट्रीय सुट्टी जाहीर केली. जगात इतरत्र युरोप, आशिया आणि दक्षिण अमेरिकेतील अनेक देशांमध्ये लोकांनी ओबामांच्या विजयाचे उत्साहाने व आशेने स्वागत केले. मात्र चीनमध्ये याबाबतीत अनास्था जाणवली तर पाकिस्तानात अनेकजण याबाबतीत साशंक होते.

श्रोत -wikipedia