गुरुवार, २२ ऑक्टोबर, २००९

शेअर बाजार


मी गुंतवणूक शेअर बाजारात करावी काय?

खरोखरच हा महत्वाचा प्रश्न आहे.

शेअर मार्केट जेव्हा पूर्णपणे तेजीत असते जसे की २००४ ते २००७ जवळपास प्रत्येकालाच शेअर मार्केट मधून भरघोस नफा मिळाला. पण किती जणानी तो खिशात घातला? फारच थोड्यानी.
कारण वेळीच नफ्यात असताना विक्री करत नाही.
उगाचच एखाद्या शेअरच्या प्रेमात पडतो.
आपल्याला वाटत की आपल्याला शेअर बाजारातल बरच काही कळत. पण खरच काहो आपल्याला कळत? स्वतःलाच प्रामाणिकपणे विचारा उत्तर मिळेल.
(आणि ज्याना खरच शेअर बाजारातिल कळतं त्यांचेसाठी या कोणाची गरजच नाही).
आपल्याकडे पुरेसे रिसर्च नसते.
मार्केट टायमिंग बरेच वेळा चुकत.

अशी अनेक कारण असतात आणि म्हणूनच ९०% पेक्षा जास्त जणाना नुकसानच होते.

डे-ट्रेडिंग - नकोरे बाबा - खर म्हणजे अजिबात करु नये. तो एक जुगारच आहे. आणि
जुगारात किती जणाना बरं पैसे मिळाले आहेत.

मग काय करावे शेअर बाजारात पैसे गुतवूच नयेत काय?
जरुर गुंतवावेत पण असे व इतकेच पैसे जे आपणाला दिर्घ मुदतिसाठी ठेवता येतिल, ज्याचेवर आपली कोणतिहि गोष्ट नजिकचे काळात अवलंबून नसेल. कधीही कर्ज काढून शेअर बाजारात गुंतवणूक कधीच करु नये. तसेच कोणाच्याहि टिपवर गुंतवणूक करु नये.

सर्वात उत्तम म्हणजे म्युचल फंडच आपल्यासारख्या सामान्य लोकाना फार चांगला. नोकरि पेशातिल माणसाने एकदम एकरकमी गुंतवणूकि ऐवजी दरमहा ठराविक रक्कम SIP द्वारे गुंतवावी.

शेअर बाजारात सर्व सामान्य माणसाने किती पैसे गुंतवावेत?
खर म्हणजे हे ज्याचे त्याचे धोका स्वीकारण्यावर अवलंबून असते.
एक तत्व म्हणून सांगावयाचे झाल्यास अस सांगता येइल आपण जेवढि बचत करतो त्यापैकि आपल्या चालू वयाचे टक्केवारिएवढी रक्कम सुरक्षीत प्रकारात गुंतवावेत आणि १०० वजा चालू वय येणारे टक्केवारिएवढी रक्कम म्युचल फंडाचे माध्यमातून शेअर बाजारात गुंतवावी.

म्युचल फंडात गुंतवणूक केल्यामुळे मिळणारे लाभ

तुम्हाला तज्ञांचे मार्गदर्शन मिळतं
प्रत्येक म्युचल फंड हाउस त्यांचे फंड व्यवस्थापनेसाठी अनेक फंड मॅनेजर्स व फंड मॅनेजरला सहाय्य करण्यासाठी रिसर्च टिम व व्यावसाइक तज्ञ यांची नेमणूक करत असतात जे तुमच्यासाठी सतत आर्थिक बाजारपेठेवर लक्ष ठेऊन असतात. ते विविध क्षेत्रातील आणि कंपन्यांमधिल मार्केट ट्रेंडस व भावी संभाव्यता यांच संशोधन नियमितपणे करत असतात. आपले रिसर्च रिपोर्ट संबधित स्किमचे फंड मॅनेजरला सादर करत असतात त्यानंतर संबधित फंड मॅनेजर तुलनात्मक अभ्यास करुन गुंतवणूकीचा अंतिम निर्णय घेत असत या तज्ञांमुळे गुंतवणूकीचा योग्य निर्णय घेता येत असतो. तस तुम्हाला एकट्याने करणे कठिण होतं आणि म्हणूनच ९०% पेंक्षा जास्त गुंतवणूकदार शेअर मार्केट मधे नुकसान सोसत असताना म्युचल फंडाचे नियमित गुंतवणूकदार मात्र दिर्घ मुदतित मोठा लाभ मिळवित असतात.

कमी जोखिम
म्युचल फंडाची खासियत म्हणजे त्यात गुंतवणूकीच्या अनेक संधी मिळतात. सामान्यपणे एकाच सिक्युरिटीतील गुंतवणूक ती कंपनी किती चांगला किंवा वाईट व्यवसाय करते यावर अवलंबून असते. पण म्युचल फंडात तुम्ही रुपये ५००० गुंतवा अथवा रुपये पाच लाख गुंतवा त्यातिल थोडी थोडी रक्कम वेगवेगळ्या अनेक कंपन्यांचे शेअर्स मधे गुंतविली जात असते जेणेकरुन तुमच्या गुंतवणूकीची जोखिम कमी होते.

तुम्हाला आवश्यक तेव्हा पैसे काढून घेण्याची सुविधा असते
ओपन एंडेड म्युचल फंड स्किमस् या बॅंकेतिल सेव्हींग खात्याप्रमाणे चालविता येत असतात म्हणजेच यात केव्हाही पैसे भरता येतात व केव्हाही काढता येतात. क्लोज एंडेड स्किम मधे केलेली गुंतवणूक काढण्यावर मात्र काही निर्बंध असतात आणि म्हणूनच बरेच तज्ञांशी सहमत होताना आम्हीसुध्दा ओपन एंडेड म्युचल फंड स्किमस् मधे गुंतवणूकीचा सल्ला देत असतो.

कमीत कमी खर्च
तुम्ही इतर अनेक गुंतवणूकदारांसोबत गुंतवणूक करत असल्यामुळे तुम्हाला तुलनात्मकदॄष्ट्या गुंतवणूकीचा खर्च कमी करावा लागतो. जर तुम्ही एकट्याने गुंतवणूक केली असती तर हा खर्च वाढला असता म्हणूनच भांडवली बाजारात थेट गुंतवणूकीपेक्षा म्युचल फंडात गुंतवणूक करायला कमी खर्च येतो.

पारदर्शकता
जमिनजुमल्यातिल गुंतवणूकीत जे शक्य होत नाही ते यात शक्य होतं. यात गुंतवणूकीचे मुल्य रोजच्या रोज जाणून घेता येते शिवाय ठराविक काळानंतर बहूधा प्रत्येक महिन्याचे अखेरीला सर्वच फंड हाऊसेस त्यांची फॅक्ट शिट प्रकाशित करत असतात जीचे आधारे तुम्ही म्युचल फंडात केलेली गुंतवणूक कोणकोणत्या कंपन्यांचे शेअर्समधे गुंतविली आहे. विविध प्रकारच्या अन्य कोणत्या ठीकाणी केलेल्या आहेत तसेच फंड मॅनेजरचे धोरणही तुम्ही ठरावीक कालावधीनंतर जाणून घेऊ शकता.

इंकम टॅक्स मुक्त परतावे
इक्वीटी म्युचल फंडावरील मिळणारे लाभांश हे पूर्णता करमुक्त असतात. शिवाय इक्वीटी म्युचल फंडात केलेली गुंतवणूक एक वर्षानंतर काढली असता पूर्णतः करमुक्त असते.

सेबी व अम्फिचे नियंत्रण
सर्व म्युचल फंड हे Security & Exchange Board of India (सेबी) आणि Association of Mutual Funds of India (AMFI) कडे नोंदणीकॄत असतात आणि गुंतवणूकदारांचे हित सांभाळणा-या तरतुदी व नियमांनुसार काम करत असतात. सेबीकडून स्टॉक एक्सचेंज आणि त्यांच्या सहचालकांवर नियंत्रण तर ठेवले जातेच शिवाय चुकीच्या सहचालनावर दंड ठोठाउन सिक्युरिटी मार्केट व सिक्युरिटी व्यवहारातील भ्रष्टाचाराला पायबंद घालते.

म्युचल फंड गुंतवणूकीव्दारा दिर्घ मुदतित संपत्ति निर्माण होवू शकेल याची कारणेः
• भारतिय अर्थव्यवस्था हि जगात अत्यंत वेगाने पुढे जात आहे हे सर्वमान्य सत्य आहे.
• परकिय गुंतवणूकदार नियमितपणे भारतिय अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवणूक करित आहेत.
• अनेक सेझ मंजूर झाले आहेत व भविष्यात ते कार्यरत होतिल.
• येत्या ५ ते ७ वर्षात पायाभूत सुविधा विभागात जसे की पॉवर, रस्ते, धरणे, पाणी योजना, टेलिकम्युनिकेशन इ अनेक उद्योग धंद्यात मोठ्याप्रमाणावर गुंतवणूक करण्याचे सरकारी व योजना आयोगाचे निर्णय झाले आहेत.
• सर्वच विभागात उद्योग धंद्याना पोषक वातावरण आहे.
• जीडिपी स्थीर आहे व पूढे वाढ अपेक्षीत आहे.
• काम करणा-या भारतियांचे सरासरी वय फक्त ३५ आहे.
• सद्या देशातिल एकूण गुंतवणूकीपैकी नगण्य म्हणजे ३ टक्के पेक्षा कमी गुंतवणूक म्युचल फंडात आहे.
• उद्योगधंद्याला पुरक असे सरकारी धोरण आहे.
• शेती व शेतीला पुरक उद्योगधंद्याला पुरक असे सरकारी धोरण आहे.
• अनेक परदेशी कंपन्यांचे काम भारतिय कंपन्या करत आहेत.
• भारतिय शेअर बाजार अद्यावत आहे व त्यावर उत्तम नियंत्रक म्हणून सेबी व रिझर्व्ह बॅंक काम करत आहेत.
• भारतिय अर्थसंस्था व उद्योगधंद्यावर उत्तम नियंत्रक म्हणून सेबी व रिझर्व्ह बॅंक काम करत आहेत.
गुजराथी समाजाने शेअर बाजार व म्युचल फंडाचे माध्यमातून भरपूर संपत्ति निर्माण केली आहे आपण मराठी माणसानेच का मागे रहावे.

ज्यानी रिलायन्स ग्रोथ फंडाच्या ग्रोथ ओप्शनमधे डिसेंबर १९९५ पासून दरमहा रुपये एक हजार मत्र गुंतवले आहेत आज त्याची व्हॅल्यू आहे २० लाख रुपये.

तुम्हाला खरं वाटत नसल तर रिलायन्स म्युचल फंडाच्या खालील संकेत स्थळावर जाउन खात्री करुन घ्या.

http://www.reliancemutual.com/Reliancesip/

प्रथमतः वरील संकेत स्थळावर गेल्यावर रिलायन्स ग्रोथ फंडाच्या ग्रोथ ओप्शन ड्रॉपडाउन मेनूमधून सिलेक्ट करा.

नंतर इंस्टॉलमेंट मधे तुम्हाला जेवढी बचत दरमहा करणे शक्य असेल तेवढी लिहा उदा १००००

नंतर पिरियड मधे मन्थलि सिलेक्ट करा.

नंतर फ्रॉम मधे प्रथमतः वर्ष १९९५ निवडा मग तुमहाला शक्य ती प्रत्येक महिन्याची तारिख बाजुचया कॅलेंडर मधुन निवडा 2 किंवा 10 किंवा 18 किंवा 28 तारिख लिहा.

नंतर टू मधे २००९ सालातील पहिली निवडलेली चालू महिन्यातील तारीख निवडा.

व्हॅल्यू तारीख आजची निवडा आणि व्ह्यू वर टिचकी मारा - तुमच्यासमोर गुंतवणूकीचा चार्टच येइल व शेवटी खाली आजची किंमत दिसेल.

आता तुमहीच ठरवा गुंतवणूक कोठे करणे फायदेशिर ते.

एक मात्र लक्षात ठेवा म्युचल फंडात पैसे गुंवताना दिर्घ काळासाठीच करा. शॉर्ट टर्म मधे काहिही होवू शकते पण दिर्घ मुदतित फायदाच होतो. दिर्घ मुदत म्हणजे किमान ५ ते १५ वर्ष.

सर्वोत्तम पर्याय दरमहा नियमित गुंतवणूक पर्यानिवडणे व पुढील तारखेचे चेक अथवा आटो डेबीट फॉर्म भरुन देणे।

-

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा