मंगळवार, १२ ऑक्टोबर, २०१०

सहवास पर्व सुरू - प्राचार्य शिवाजीराव भोसले (भाग १३)


नियती महापुरुषांना उदंड गुणवत्तेचे वरदान देते. त्याच वेळी त्यांचे आयुर्मान हिरावून घेते. विवेकानंदांच्या बाबतीत तेच घडले. उभ्या भारताची यात्रा करणारे, दोन वेळा अमेरिकेत जाऊन येणारे, युरोपचा काही भाग पाहणारे, ब्रिटिशांच्या राजधानीत आपल्या भाषाप्रभुत्वाने आणि ज्ञानविज्ञान संपन्नतेने अनेकांना प्रभावित करणारे, भगिनी निवेदितांसारख्या प्रज्ञासंपन्न सुकन्यांचा भक्तिभाव संपादन करणारे विवेकानंद केवळ चाळीस वषेर् भूतलावर राहिले. त्यातले काही दिवस कालपुरुषाने हिरावून घेतले.

विवेकानंदांना लहानपणापासून मधुमेहाचा विकार होता. त्या काळी हा विकार रोखण्याचे प्रभावी मार्ग जगाला माहीत नव्हते. विवेकानंद उत्तम खेळाडू होते. सुदृढ बांध्याचे होते. शास्त्रीय संगीताचे जाणकार होते. त्यांच्या भाषाज्ञानाचे कौतुक होत असे. संस्कृत, इंग्रजी, बंगाली, पशिर्यन, फ्रेंच अशा विविध भाषांतून ते विचारविनिमय आणि सहज संवाद करीत.

त्यांना मनातून परमेश्वराची ओढ वाटत असे. पण जगाच्या रचनेत अनेक त्रुटी ठेवणारा परमेश्वर असे का करतो याचे कोडे पडत होते. कधी कधी ते म्हणत : ''स्वर्गात सिंहासन देणारा; पण भूतलावर भाकरीची भ्रांत पाडणारा लहरी देव मला मान्य नाही.''

त्यांचे मन हे एक कुरुक्षेत्र झाले होते. अनेक परस्परविरोधी विचारांचे संगर तेथे चालत असे. त्यांनी विवाह टाळला. संसार हा विचार सोडला. नोकरी, व्यवसाय, दव्यलाभ यांचे गणित मांडले नाही. ते जीवनाचे पूर्ण वेळ अभ्यासक व उपासक म्हणून जगले. जीवनाची अर्थपूर्णता ज्यावर अवलंबून आहे अशा परमतत्त्वांचे चिंतन, संशोधन केले. त्यासाठी पातंजल योग अभ्यासला. गुरूचा शोध घेतला आणि शेवटी ते रामकृष्णांच्या चरणी थांबले.

रामकृष्णांना विदेही स्थितीत विवेकानंदांचे पूर्वजन्म आणि भविष्यकालीन कार्य यांचे आकलन घडले. ते त्यांनी आपल्या मनात ठेवले. विवेकानंदांना अधिकारी मार्गदर्शक हवा होता. रामकृष्णांना आपल्या साधनेची गाथा ज्याला समजावून द्यावी असा अधिकारी शिष्य हवा होता. नियतीने ही गाठभेट घडवून आणली.

रामकृष्णांचा साधनाकाल संपला आणि त्यांना सिद्धावस्था प्राप्त झाली. या अवस्थेत कोलकात्यातील अनेक विद्वान, अधिकारी, समाजपुरुष त्यांच्याकडे आकृष्ट झाले.

विवेकानंदांना ओळखणारे सुरेंदनाथ मित्र, रामचंद दत्त, व्रजेंदनाथ सील असे काही सांगाती होते. त्यांनी त्यांना सांगितले की, ''तू शेलीच्या कविता वाच. रामकृष्णांना भेट.'' प्राचार्य हेस्टी यांनी पण तेच सुचविले.

विवेकानंदांचे आजोबा पारमाथिर्क होते. आई भाविक होती. वडील मात्र रसिक, विद्वान पण अज्ञेयवादी होते. परमेश्वर हा त्यांच्या लेखी एक गौण आणि अर्थशून्य विषय होता. त्यांना पशिर्यन काव्य फार आवडे. त्यांच्या दिवाणखान्यात रसिकांची आणि पंडितांची सभा भरे. या सभेत बाल नरेन्दाला आनंदाने आणि अगदी बरोबरीने सामावून घेतले जात असे.

आई रामायण महाभारताचे वाचन करीत असे. तशी ती व्रतस्थ होती. विवेकानंदांच्या जन्मापूवीर् तिने काशीच्या विश्वेश्वराला नवस केला होता. त्याला एक लक्ष बिल्वदले वाहण्याची प्रतिज्ञा केली होती. विवेकानंदांचा जन्म झाला आणि आईने असे गृहीत धरले का आपला सुपुत्र हा शिवाचा अंशावतार आहे. मुलाचा व्रात्यपणा असह्य झाला म्हणजे रागाने म्हणत असे : शिवाला मी पुत्र मागितला आणि त्याने हा रुद धाडला.

अशा अपवादभूत आणि विलक्षण मुलाला वडिलांनी पूर्ण स्वातंत्र्य दिले. विवेकानंदांचे शिक्षण वारंवार खंडित झाले. प्रगती पुस्तकात गुणसंख्येची झगमग कधी दिसली नाही. ते बी. ए. ची परीक्षा द्वितीय श्ाेणीत उत्तीर्ण झाले. तथाकथित गुणवत्ता यादीची तमा त्यांनी बाळगली नाही. पूवीर् हे शैक्षणिक वेड विकोपाला गेले नव्हते.

विवेकानंदांना ऑफिसर, वकील, डॉक्टर, इंजिनिअर असे काहीच व्हावयाचे नव्हते. त्यांना कृतार्थ आणि अर्थपूर्ण जीवन तपस्यापूर्वक जगावयाचे होते. जीवनाची महत्ता आणि अर्थपूर्णता ज्यावर अवलंबून आहे अशा तत्त्वांचा शोध आणि बोध हाच त्यांचा ध्यास होता. या ध्यासाने त्यांना रानोमाळ फिरवले आणि रामकृष्णांच्या पुढे उभे केले. या दोन व्यक्तिमत्त्वांची युती हा एक विलक्षण योग होता. दोघांच्या दर्शनी रूपात आणि जीवनशैलीत फरक होता.

रामकृष्णांची शाळा सुरुवातीलाच सुटली होती. ते बोलताना अडखळत. त्यांची अंगकाठी बेताची होती. ते समाजात फारसे फिरले, वावरले नव्हते. दक्षिणेश्वर आणि कोलकाता आणि त्यांचे जन्मगाव कामारपुकूर या परिघात ते राहिले, वावरले. एखादी तीर्थयात्रा एवढाच काय तो अपवाद! या उलट विवेकानंद हे राजबिंडे, रुबाबदार, व्यासंगी, वक्तृत्वसंपन्न, क्षात्रतेजाने तळपणारे, दिग्विजयी आणि विश्वसंचारी होते.

विवेकानंद हे कोणाची तमा बाळगणारे, कोणापुढे नमणारे किंवा कशानेही दीपून अथवा भारावून जाणारे नव्हते. रामकृष्णांकडे कोलकात्त्यातील मान्यवर आणि महाज्ञानी जात असत. यामुळे विवेकानंदांना त्यांचे कौतुक वाटे, त्यांच्याविषयी कुतूहल वाटे. अनेक वर्षांच्या सावध सहवासातून, अगदी तावून सुलाखून घेतल्यावर त्यांनी हे जाणले की ''पूवीर् जो राम झाला, कृष्ण झाला तोच हा रामकृष्ण.''

रामकृष्ण-विवेकानंद यांचे सहवासपर्व, संवादपर्व हे एक परमार्थ रामायण ठरले.

या रामायणात संस्कृतीचे सार आहे. सर्व धर्मांचा आशय आहे. ज्ञानविज्ञानाचा प्रकाश आहे. भगवान बुद्धांची करुणा आहे. शंकराचार्यांचा विवेक आहे. सॉक्रेटिसाचा संवाद आहे. जे-जे अर्थपूर्ण ते सर्व आहे. प्रगल्भ मनुष्यत्व आणि पारमाथिर्क दिव्यत्व यांचा प्रकाश आहे. चंदाच्या दिशेने झेप घेणाऱ्या शास्त्रज्ञाच्या मनातील विकल्प दूर करण्याची शक्ती आहे. निरासक्त संन्यस्तांची मानसिक श्रीमंती दुरिताचे तिमिर घालवू शकेल असा गाढ विश्वास आहे.

( क्रमश:)

- प्राचार्य शिवाजीराव भोसले

शुक्रवार, १६ जुलै, २०१०

mGinger ला जॉईन व्‍हा आणि एस.एम.एस. वाचून पैसे कमवा

SMS जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवून कंपन्यांना होणारा फायदा जर तुम्हाला देखिल मिळणार असेल तर ... आणि पैसे कुणाला नको आहेत? तुम्हाला रोज SMS येतील ते फक्त वाचायचे आहेत आहे ना सोपं काम आणि हो ते तुम्हाला फुकट वाचायचे नाहीत तर प्रत्‍्येक SMS वाचल्‍यानंतर तुम्हाला 20 पैसे मिळणार आहेत। तुमच्या मित्रांना, नातेवाईकांनाही समाविष्ठ करून घ्या त्यांनी SMS वाचल्यावर देखील तुम्हाला प्रत्येक SMS वर 10 पैशाची कमाई होणार आहे. पैसे तुम्हाला तुम्ही दिलेल्या पत्यावर घरपोच चेकने मिळणार आहेत. तर मग वेळ न दवडता इथे क्‍लीक करा आणि तुम्‍हीही पैसे मिळवायला सुरूवात करा....
http://img.mginger.com/img/banner/mg468x60_red.png"/>

बुधवार, १४ एप्रिल, २०१०

adMAD ला जॉईन व्हा आणि SMS वाचून पैसे कमवा.


SMS जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवून कंपन्यांना होणारा फायदा जर तुम्हाला देखिल मिळणार असेल तर हरकत नाही ना ... आणि पैसे कुणाला नको आहेत?
तुम्हा6ला रोज SMS येतील ते फक्त तुम्हाआला वाचायचे आहेत आहे ना सोपं काम आणि हो ते तुम्हा ला फुकट वाचायचे नाहीत तर प्रत्येतक SMS वाचल्याजनंतर तुम्हाला 20 पैसे मिळणार आहेत. तुमच्या मित्रांना, नातेवाईकांनाही समाविष्ठ करून घ्या त्यां नी SMS वाचल्यावर देखील तुम्हायला प्रत्येक SMS वर 10 पैशाची कमाई होणार आहे.
खाली तक्त्यात दाखविल्याळप्रमाणे तुम्ही् सर्कल तयार केले तर तुम्ही किती कमावू शकता तर चक्क 5160 रूपये.
पैसे तुम्हाला तुम्ही दिलेल्या पत्यावर घरपोच चेकने मिळणार आहेत. तर मग वेळ न दवडता

येथे टिचकी मारा

आणि तुम्‍हीही पैसे मिळवायला सुरूवात करा....

How Much You Get

Earn for 5 levels:

• Get 20 paise for each SMS you recieve.
• Get 15 paise for each SMS your friends recieve.
• Get 10 paise for each SMS their friends recieve.
• Get 5 paise for each SMS their friends recieve.
• Get 1 paisa for each SMS their friends recieve.

Calculator
Have fun calculating your earnings!
________________________________________
Ads you receive daily: 10


Friends you refer: 10

Friends each of them refers: 10

Friends each of them refers: 5

Friends each of them refers: 3

Every month, you can earn: 2

Rs. 5160.00

सोमवार, ९ नोव्हेंबर, २००९

पक्ष्यांचे आवाज - श्री. शरद आपटे.

महाराष्ट्रातील पक्ष्यांचे श्री। शरद आपटे यांनी प्रत्यक्ष निसर्गात जाऊन आधुनिक यंत्रणेच्या साहायाने टिपलेले अस्सल आवाज ... रंगीबेरंगी पक्षी आणि त्यांचे चित्रविचित्र आवाज आपलं चटकन्‌ लक्ष वेधून घेतात. आपण आपल्या परीनं पक्षांचे आवाज शब्दात पकडण्याचा प्रयत्न करतो. कोकीळ पक्षाचा कुहू कुहू, पावश्याचा पेर्ते व्हा, शिंच्याचा च्युव्हिट्‌ च्युव्हिट्‌ किंवा तांबट्याचा पुक्‌ पुक्‌ ! पक्षांचे आवाज ओळखता आले, तर पक्ष्यांची ओळख तर पटेलच शिवाय त्यांच्या वागणुकीचे असंख्य कंगोरे दिसायला लागतात. पक्षी आणि प्राणी यांच्यातलं नातं उलगडतं. या ध्वनीफितीमध्ये महाराष्ट्रात दिसणार्‍या अनेक पक्ष्यांचे आवाज ध्वनीमुद्रित केले आहेत. हे आवाज श्री शरद आपटे यांनी आधुनिक उपकरणांच्या साहाय्याने टिपले आहेत. त्यास अवश्य भेट द्या।

http://www.birdcalls.info/BetaApp/BetaApp.php

शुक्रवार, ६ नोव्हेंबर, २००९

एक अशी ही स्पर्धा ...

काही वर्षांपूर्वीची. सिएटलच्या ऑलिम्पिकमध्ये शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेत सहभागी झालेले नऊ स्पर्धक स्पर्धा सुरू होण्याच्या संकेताची वाट पाहात जय्यत तयार उभे होते. ही सारी मुलं शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या अपंग होती. पिस्तुलाचा आवाज झाला आणि शर्यत सुरू झाली. साऱ्यांनाच पळता येत होतं असं नाही. पण, प्रत्येकाला स्पर्धेत भाग घ्यायचा होता आणि महत्त्वाचं म्हणजे जिंकायचं होतं. धावता धावता एकाचा तोल गेला.. काही गोलांट्याखाऊन तो पडला आणि रडू लागला. त्याच्या रडण्याचा आवाज ऐकून अन्य आठही जण पळायचे थांबले. सारे मागे फिरले... सारे जण... " डाउन्स सिन्ड्रोम 'ची व्याधी असलेली एक मुलगी त्याच्या जवळ बसली. तिने त्याला मिठी मारली आणि मग विचारलं, ""आता बरं वाटतंय? ' ' मग साऱ्यांनी त्याला उभं केलं आणि अंतिम रेषेपर्यंत सारे खांद्याला खांदा लावून चालत गेले. ते दृष्य पाहून मैदानावर उपस्थित असलेले सारेजण हेलावून गेले. उभे राहून मानवंदना देत साऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. बराच काळ त्या टाळ्यांचा आवाज आसमंतात गुंजत होता... त्यावेळी तिथे उपस्थित असलेली मंडळी अजूनही त्या घटनेची आठवण काढतात. का ? कुठेतरी आत खोलवर आपल्याला प्रत्येकाला ठाऊक असतं की आयुष्यातली सर्वांत महत्त्वाची गोष्ट असते ती स्वतःसाठी जिंकण्यापेक्षा इतरांना जिंकायला मदत करणं. त्यासाठी वेळप्रसंगी आपला वेग कमी करावा लागतो किंवा अगदी शर्यतच बदलावी लागते..

गुरुवार, २२ ऑक्टोबर, २००९

उपयुक्त वेबसाइट्स ...

मला आवडलेल्या विविध वेबसाइट्स ....
अध्यात्म विषयक
http://www.vishwachaitanyamission.com/mr/node/121
http://www.pujaarcha.com/aarti

वास्तुशास्र
http://www.sanatan.org/marathi/dainik/visheshank/vaastushastra/index.htm#2

श्राधविधि
http://sanatan.org/marathi/dainik/visheshank/pitrupaksha/pitru1.htm#1


शिक्षण
http://sites.google.com/site/pearlsproject/

http://marathishabda.com/?q=node/126

http://marathishabda.com/?q=node/122

http://www.baljagat.com

http://www.avakashvedh.com/

http://www.school4all.org


शैक्षणिक पाठ्यपुस्तके

http://www.indg.in/primary-education/childrenscorner/viit_indg


ई - पुस्तके

http://sites.google.com/site/marathinet/Home/vacaka-1

http://www.khapre.org
http://www.scribd.com/people/documents/635222/folder/24459

मृत्यूची तारीख सांगनारी वेबसाइट

http://www.deathclock.com/


संगणक शिक्षण

http://aapalasanganak.blogspot.com/

मुलांसाठी सुटीतील ‘अॉनलाईन’ टाईमपास

funology_ad_300x250

सुट्यामधे आपल्या आवडी-निवडीनुसार गाण्याचे, वाद्यांचे, खेळांचे क्लास लावण्यापासून ते पूर्णवेळ शिबिरांपर्यंत आणि मामाच्या गावापासून ते सिंगापूर, मलेशियापर्यंत विविध पर्याय मुलांसमोर उपलब्ध असतात. मुलांचा उत्साह भलता दांडगा असतो. सकाळी दोन-दोन क्लास करूनही ही मुलं थकत नाहीत. दुपारी रणरणत्या उन्हातदेखील बाहेर पडायची त्यांची तयारी असते. हे टाळण्यासाठी त्यांना घरातच कोणत्यातरी अॅक्टिव्हिटीमध्ये गुंतवून ठेवता येईल का, याचा विचार सतत आई-वडिलांच्या डोक्यात सुरू असतो.

टीव्ही पाहू द्यावा? नको…
कॉम्प्युटर गेम खेळू द्यावा? नको…
बैठे खेळ? आवडत नाहीत…

अशा वेळी तुम्ही त्यांना काही उत्तम वेबसाईट्सवर गुंतवून ठेवू शकता. खास मुलांसाठी तयार केलेल्या या साईट्समुळे ती गुंतूनही राहतील आणि त्यांच्या ज्ञानात भरदेखील पडेल.

१. फनॉलॉजीः

आई, मला बोअर होतंय…काय करू सांग ना, या प्रश्नावरचं उत्तर म्हणजे फनॉलॉजी डॉट कॉम! उन्हाळ्याच्या सुटीसाठी एक आदर्श साईट म्हणून या साईटचा उल्लेख करता येईल. जादुचे प्रयोग, विज्ञानातील खेळ, मेंदूला चालना देणारे छोटे गेम्स, मुलांना करता येतील अशा रेसिपीज आणि आणखीही बरंच काही या साईटवर पाहायला मिळेल. मुलांच्या ज्ञानात भर घालेल अशी माहिती ‘व्हॅकी फॅक्ट्स’ या सेक्शनमध्ये मिळेल.

Link: http://www.funology.com/

२. बॉब द बिल्डर

बॉब द बिल्डर या सुप्रसिद्ध कार्टून कॅरेक्टरची ही वेबसाईट. बॉब मुलांना नवनवीन गोष्टी बांधायला शिकवेल. उदा. मैदान बांधण्यासाठी कोणकोणते साहित्या लागते, कोणकोणत्या स्टेप्स असतात हे सांगितल्यानंतर मुलांनी योग्य साहित्य निवडून ठरवून दिलेली स्टेप पूर्ण करायची. असे विविध प्रोजेक्ट्स यात आहेत. शिवाय रंग भरण्यासाठी विविध पोस्टर्सदेखील उपलब्ध आहेत.

Link: http://www.bobthebuilder.com/uk/

३. नासा किड्स क्लबः

मुलांना काही वेळा अगदी टाईमपास गेम्स खेळायला आवडतं. अशा टाईमपास गेम्समधून अंतराळाची रहस्यमय सफर घडवायची असेल तर त्यांना नासा किड्स क्लब या साईटची ओळख करून द्या. स्मरणशक्ती वाढवणारे छोटे-छोटे गेम्स खेळण्यात मुलं कशी दंग होऊन जातील, हे कळणार देखील नाही.

Link: http://www.nasa.gov/audience/forkids/kidsclub/flash/index.html

४. सीझम स्ट्रीटः

विविध कार्टून कॅरेक्टर्ससोबत धमाल गेम्स खेळण्यासाठी सीझम स्ट्रीट ही एक उत्तम साईट आहे. गेम्ससोबतच सीझम प्लेलिस्ट्स या विशेष सेक्शनमधून मुलांना पर्यावरणाचे महत्त्व, एकमेकांची काळजी घेणे असे विषयही समजावून सांगता येतात.

Link: http://www.sesamestreet.org/home

५. पझल चॉईसः

मुलांना गेम्स किंवा अॅक्टिव्हिटीज आवडत नसतील तर त्यांच्यासाठी विविध पझल्स देणारी ही एक उत्तम साईट. यातील विशेष सेक्शनमध्ये खास मुलांसाठी तयार केलेली शब्दकोडी, सुडोकू, संख्याकोडी तुम्हाला पाहायला मिळतील. या कोड्यांचे प्रिंट आऊट काढून तुम्ही मुलांना सोडवायला देऊ शकता.

Link: http://www.puzzlechoice.com/pc/Kids_Choicex.html